Dombivli Shawarma Girl Ekta Sawant News Saam Tv
व्हायरल न्यूज

Dombivli : "... हे सुधारणार नाहीत" डोंबिवलीच्या शॉरमा गर्लला पुन्हा दिला त्रास , Video व्हायरल

Dombivli Shawarma Girl Ekta Sawant News : डोंबिवली स्टेशनबाहेर शोरमा विकणाऱ्या एकता सावंतला पुन्हा व्यवसायिकांकडून त्रास दिल्याचा आरोप.पुन्हा एकदा व्हिडिओ व्हायरल

Alisha Khedekar

  • डोंबिवली स्टेशनबाहेर शोरमा विकणाऱ्या एकता सावंतचा नवा व्हिडिओ व्हायरल

  • व्यापाऱ्यांकडून शिवीगाळ व हुज्जतीचा आरोप

  • याआधी राज ठाकरे व अविनाश जाधव यांनी दिला होता पाठिंबा

  • प्रकरणामुळे पुन्हा एकदा स्थानिक वाद पेटण्याची शक्यता

डोंबिवली स्टेशन बाहेर अनेकजण उदर्निवाहासाठी छोटा मोठा व्यवसाय करतात. यावर अनेकदा पालिकेने कारवाई केली असून देखील इथे अनेक परप्रांतीय किंवा स्थानिक मराठी नागरिक दुकान टाकून रस्त्यालगत व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी याच डोंबिवली स्टेशन बाहेर शोरमा विकणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. तिचे असे म्हणणे होते की तिच्याकडून हप्ता वसूल केला जातो, शिवाय तिच्या स्टॉलवरून तिच्याशी हुज्जत घातली जाते. या व्हायरल व्हिडिओनंतर राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांनी तरुणीला पाठिंबा देत तिला नवीन स्टॉल लावून दिला. त्यानंतर आता पुन्हा एकदा या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्याशी आजूबाजूला असलेल्या व्यावसायिकांनी हुज्जत घातली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, डोंबिवली स्टेशन बाहेर एकता सावंत या मराठी तरुणीची शोरमा विकणारी एक गाडी आहे. दररोज शोरमाची गाडी ज्या ठिकाणी लावली जाते त्याच ठिकाणी फ्रँकी विकणाऱ्या परप्रांतीय तरुणाने त्याचा व्यवसाय सुरु केला. दरम्यान या प्रकरणावरून भर रस्त्यात वाद निर्माण झाला.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या काही तरुणांनी आणि महिलांनी तिला शिवीगाळ केल्याचाही प्रकार घडला आहे. या व्हिडिओमध्ये शिव्या देणाऱ्या महिला सुद्धा आम्ही मराठी आहोत, आमची देखील लहान मुलं आहेत असं म्हणताना पाहायला मिळत आहे. दरम्यान शोरमा गर्ल एकताने स्टॉलवरून तिला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकटा सावंत हिने हा व्हिडिओ तिच्या sawant_shawarma या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. याआधी देखील तिने एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये तिने परप्रांतीय तरुणाला कामावर का ठेवलं? याचं उत्तर दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जय पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला चांगला प्रतिसाद

BJP vs TMC Clash : निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हत्यासत्र, भाजप नेत्यासह आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

Accident News: मोठी बातमी! 'प्रभास'च्या क्रू मेंबर्सच्या कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर

Pune : पोलीस दलात खळबळ! १.५ लाखांची लाच घेताना हवालदाराला रंगेहाथ पकडलं; कारवाईदरम्यान तक्रारदाराच्या छातीचा घेतला चावा

Health care: जेवणानंतर फळे खाणं योग्य आहे का? कोणती फळे ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT