Viral Video Canva
व्हायरल न्यूज

चायवाल्या डॉलीची रॉयल एंट्री, बुर्ज खलिफावर घेतला कॉफीचा आस्वाद; Video व्हायरल

Viral Video: इंटरनेट सेन्सेशन डॉली चायवाला अनेक लोकांना माहिती आहे. गेल्या आठवड्यात डॉली चायवाला दुबईला गेला होता. त्यावेळी त्यानी बुर्ज खलिफा येथे कॉफीचा आस्वाद घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral : इंटरनेट सेन्सेशन डॉली चायवाला पुन्हा एकदा त्याच्या इंस्टाग्राम रीलमुळे चर्चेत आलाय. या व्हिडिओमुळे त्याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलंय. भारतातील सर्वात प्रसिद्ध चहा विक्रेत्यांपैकी एक डॉली चायवाला गेल्या आठवड्यात दुबईला फिरायला गेला होता. या दुबई दौऱ्यादरम्यान तो एका आलिशान गाडीमध्ये बुर्ज खलिफा पहायला गेला होता. तिथे त्याने नवीन रील शूट केले जे इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डॉली दुबईमधील प्रतिष्ठित बुर्ज खलिफावर कॉफीची चुस्की घेताना दिसत आहे. बुर्ज खलिफा दुबईमधील सर्वात उंच इमारत आहे.

डॉली चायवालाने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, "एक कॉफी पीने बुर्ज खलिफा के टॉप पे गए" असे कॅप्शन दिले आहे. डॉली चायवाला नावाने प्रसिद्ध असलेले सुनील पाटील, नागपूरचा चहा विक्रेता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला डॉली चायवालाच्या टपरीवर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे चहा प्यायले होते. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर इंटरनेटवर बिल गेट्स आणि डॉलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. डॉलीच्या अतरंगी स्टाईलमुळे तो सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. नेटकऱ्यांनीदेखील त्याच्या या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडलाय.

काही महिन्यांपूर्वी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे भारत दौऱ्यावर होते. त्या दरम्यान त्यांनी नागपुरामधील डॉली चायवाल्याच्या स्टॉलवरून चहाचा आस्वाद घेतला, त्या दरम्यान डॉ़लीने बिल गेट्स त्याच्या स्टॉलवर चहाचा आस्वाद घेताना काढलेले फोटोज आणि व्हिडिओज त्याच्या सोशल मिडियोवर पोस्ट केले.

ते फोटो व्हिडिओज् प्रचंड व्हायरल झाले. बिल गेट्स यांनी व्हिडिओ पोस्ट करताना 'चाय पे चर्चा' असं व्हिडिओला कॅप्शन दिले होते. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले होते. काही लोक त्याला 'जॅक स्पॅरो ऑफ इंडिया' म्हणून देखील ओळखतात. दुबईला जाण्याआधी डॉली चायवाला मालदीवला फिरायला गेला होता. त्याचे तिथे काढलेले फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Wedding : शुभ मंगल सावधान! लोकप्रिय अभिनेता मेघन प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न बंधनात अडकला, पाहा VIDEO

Kharvas Recipe : ग्लासभर दुधाचा बनवा इन्स्टंट खरवस, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: नामांकनासाठी आज शेवटचा दिवस, रॅलीसह शक्ती प्रदर्शनाची तयारी

Mine Collapse : पूल तुटला, आरडाओरडा अन् किंकळ्या, ४० जणांचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना eKYC साठी २ महिन्यांची मुदतवाढ मिळणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT