भारतात अनेक चहाप्रेमी आहेत. कामाच्या व्यापात आळस आणि डोळ्यांवरची झोप उडवण्यासाठी चहाची एक चुसकी देखील भरपूर असते. तासंतास अभ्यास करणारे विद्यार्थी, ऑफिसमधील कर्मचारी आणि रोजनदारीने काम करणारे कामगार कोणीही असले तरी प्रत्येकाला चहा आळस घालवण्यासाठी चहा लागतोच.
चहाच्या टपरीवर नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. भारतात एमबीए चायबाला, ग्रॅज्युएट चायवाली अशा विविध नावांनी चहाची टपरी टाकण्यात आली आहे. चहाच्या टपरीवर चहा विकून अनेकांनी आजवर लाखो रुपये कमवले आहेत. फक्त चहा विकून अनेकांचं नशीब फळफळलं आहे. त्यामुळे आज भारतातील श्रीमंत चहावाल्यांची नावे जाणून घेऊ.
ग्रॅज्युएट चायवाली
ग्रॅज्युएट चाय चालवणाऱ्या मुलीचं नाव प्रियांका आहे. प्रियांका मुळची बिहारची आहे. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यावर तिने सरकारी नोकरीसाठी ट्राय केलं. यासाठी तिने भरपूर अभ्यास देखील केला. मात्र सरकारी नोकरी न मिळाल्याने तिने थेट चहाचं दुकान टाकलं आणि त्याला ग्रॅज्युएट चाय असं नाव दिलं. फक्त ३ वर्षांमध्ये प्रियांकाने अनेक ठिकाणी ग्रॅज्युएट चायवालीची दुकाने सुरू केली. यातून ती आज लाखो रुपये कमवते.
डॉली चायवाला
डॉली चायवाला म्हणजेच सुनिल पांडे. सुनिल पांडेने नुकतेच बिल गेट्स यांना चहा बनवून दिला आहे. त्यामुळे सध्या तो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. डॉली चहा विकताना वेगळ्या ट्रीक्स वापरतो.आपल्याकडे आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे तो मनोरंजन देखील करतो. सोशल मीडियावर फेमस झालेला डॉली चायवाला आज महिन्याला लाखो रुपये कमत आहे.
चाय सुट्टा बार
इंदौर गर्ल्स कॉलेयेथून अनुभव दुबेने आपल्या चायच्या टपरीला सुरुवात केली. त्याने आपल्या टपरीला चाय सुट्टा बार असं नाव दिलं. त्याने भारतासह अन्य देशांत देखील चाय सुट्टा बारचे आउटलेट ओपन केले आहेत. अनुभवची नेटवर्थ १० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
एमबीए चायवाला
एमबीए चायवाला चालवणाऱ्या तरुणाचं नाव प्रफुल्ल बिल्लोरे असं आहे. त्याने देखील एमबीएचं शिक्षण सोडून स्वत:ची चहाची टपरी सुरू केली आहे. त्याने आजवर अनेक ठिकाणी एमबीए चायवालाच्या फ्रँचायजी ओपन केल्या आहेत. यातून त्याने आजवर २४ कोटींची संपत्ती निर्माण केली आहे.
चाय पॉइंट
चाय पॉइंटचे मालक अमुलीक सिंग बिजराल यांनी हार्डवर्ड युनिव्हरसीटीतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी साल २०१० मध्ये या व्यवसाया सुरूवात केली. आता जगभरात त्यांच्या चाय पॉइंटचे १५० हून अधिक आउटलेट आहेत. तसेच आपल्या व्यवसायातून ते कोटींच्या घरात पैसे कमवतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.