Delhi Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : धावत्या स्कुटीवर विजेचा खांब पडता पडता राहिला, महिला थोडक्यात बचावली, घटना CCTV मध्ये कैद

Delhi Viral Video : दिल्ली येथे पावसानंतर जुना विजेचा खांब अचानक तुटून एका दुचाकीवर पडला. या दुचाकीवर असलेली महिला थोडक्यात बचावली असून सीसीटीव्ही फुटेजमधून अपघाताचे भयावह चित्र समोर आले आहे.

Alisha Khedekar

  • पश्चिम दिल्लीतील टागोर गार्डन येथे विजेचा खांब कोसळून एक महिला थोडक्यात बचावली.

  • स्कूटरवरून जात असताना खांब मागच्या सीटवर पडला; महिला किरकोळ जखमी.

  • स्थानिक लोकांनी महिलेला वेळीच मदत करून वाचवले.

  • नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर रोष व्यक्त केला आणि धोकादायक खांब हटवण्याची मागणी केली.

पश्चिम दिल्लीतील टागोर गार्डन परिसरात सोमवारी सायंकाळी एक मोठी दुर्घटना अवघ्या काही सेंकदांच्या फरकाने टळली. पावसामुळे आधीच ओलसर व घसरत्या झालेल्या रस्त्यावरून एक महिला स्कूटरने जात असताना अचानक तिच्या मागून एक जुना विजेचा खांब कोसळला. खांब थेट स्कूटरवर पडला, पण सुदैवाने महिलेचा जीव वाचला असून तिला किरकोळ दुखापत झाली आहे.

ही घटना सायंकाळी ५:३० च्या सुमारास टागोर गार्डनच्या एडी ब्लॉक परिसरात घडली. ही महिला एक फिजिओथेरपिस्ट असल्याचं समोर आलं आहे. रस्त्याच्या कडेला लावलेले दोन जुने विजेचे खांब अचानक तुटून खाली पडले. त्याच क्षणी स्कूटरवरून जात असलेल्या महिलेच्या वाहनावर मागच्या बाजूला एक खांब आदळला. या घटनेदरम्यान प्रसंगावधान राखून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत महिलेची सुटका केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

स्थानिकांनी सांगितले की, या परिसरातील अनेक विजेचे खांब वर्षानुवर्षे झुकलेले किंवा कमकुवत अवस्थेत आहेत. प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या काळात असे खांब कोणत्याही क्षणी कोसळून गंभीर दुर्घटना घडवू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

या घटनेने पुन्हा एकदा दिल्लीतील सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या प्रकारे महिलेच्या केवळ थोडक्यात जीव वाचला, ते पाहता संबंधित विभागांनी तत्काळ कारवाई करून अशा धोकादायक विजेच्या खांबांची तपासणी व दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. हा अपघात टळला असला, तरी भविष्यात अशा निष्काळजीपणाचा मोठा फटका बसू शकतो, याची जाणीव प्रशासनाने घेतली पाहिजे.

ही दुर्घटना कुठे घडली?

ही घटना पश्चिम दिल्लीतील टागोर गार्डन परिसरात घडली.

महिलेची स्थिती काय आहे?

महिला किरकोळ जखमी झाली असून तिचा जीव थोडक्यात वाचला आहे.

अपघाताचे नेमके कारण काय होते?

रस्त्याच्या कडेला उभा असलेला जुना विजेचा खांब पावसानंतर तुटून स्कूटरवर पडला.

नागरिकांचे काय म्हणणे आहे?

नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत धोकादायक खांब तत्काळ हटवण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारतातील कोणकोणती राज्ये अरबी समुद्राला लागून आहेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai High Court: हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, सर्वांना बाहेर जाण्याच्या सूचना; VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरात बंजारा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन

'ठाणे यांच्या बापाची आहे का?', संजय राऊत कडाडले, शिंदे गटाला खडेबोल सुनावले

Mahalaya Amavasya 2025: कधी आहे महालया अमावस्या? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT