Viral Video News Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video News: संपत्तीसाठी सुनेचे निर्दयी कृत्य! सासूला बेदम मारहाण; केस ओढले, गाल चावला अन्... पाहा व्हिडिओ

Daughter In Law Beats UpOld Mother In Law: हा व्हायरल व्हिडिओ गुजरातमधील (Gujrat) सुरत शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे...

Gangappa Pujari

Viral Video News: घराघरात होणारा सासू- सुनांचा वाद काही नवीन नाही. शुल्लक कारणांवरुन दोघींमध्ये नेहमीच शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळते. अगदी टीव्हीवरील मालिकांमध्येही सासू- सुनेची जुगलबंदी आपल्याला अनेकदा पाहायला मिळते.

मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सुन आपल्या सासूला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. (Viral Vi

काय आहे संपूर्ण प्रकरण?

संपत्तीसाठी घराघरात होणारी भांडणे काही नवीन नाहीत. संपत्तीच्या एका तुकड्यासाठी अनेकदा रक्ताचीच नाती एकमेकांच्या जीवावर उठल्याचेही अनेक उदाहरणे ऐकली असतील. सध्या असाच एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये याच संपत्तीसाठी सून आपल्या वृद्ध सासूला जबर मारहाण करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ गुजरातमधील (Gujrat) सुरत शहरातील असल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये घरात सून सासूला पकडून मारहाण करत आहे. धक्कादायक म्हणजे या भांडणात ती सासूचे केस पकडताना, गाल चावताना दिसत आहे. घरात काही पुरूष मंडळीही बसल्याचे दिसत आहे. मात्र ही भांडणे सोडवायला कोणीही पुढे येत नाही...

डॉक्युमेंट्री फिल्ममेकर दीपिका नारायण भारद्वाज यांनी हा व्हिडिओ (Viral Video) शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हा संपूर्ण प्रकार संपत्तीच्या वादातून झाल्याचे सांगितले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या कठोर सुनेला चांगली शिक्षा करण्याची मागणी केली आहे. तर काही जणांनी संपत्तीसाठी लोक कोणत्याही थराला जातात.. असे म्हणत संताप व्यक्त केला आहे... (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी नेमकी कुठपर्यंत? आयोग घेणार 18 जिल्ह्यांचा आढावा

Maharashtra News Live Update: Mumbai: सांगली जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ९४ टक्के मतदानाची नोंद.

५ मिनिटांत एकाच रस्त्यावर १४ अपघात; मुंबईतील घटनेने खळबळ

Home Decor : घरात बसवा या रंगाच्या टाईल्स, साफ-सफाई टेन्शनच होईल दूर

Fridge Cleaning Tips: दिवाळीआधी घरातील फ्रिज कसा स्वच्छ करायचा? सोप्या 5 टिप्स जाणून घ्या

SCROLL FOR NEXT