Ahmedabad Viral Video: हात पकडला, किस केलं.. रोडरोमियोच्या कृत्यानंतर पोरींनी घडवली अद्दल! भररस्त्यात धरुन तुडवला; व्हिडिओ व्हायरल...

Ahmedabad Teenage Sisters Beat Molester in Public: व्हायरल व्हिडिओमध्ये नराधम रस्त्यावर पडलेला दिसत असून हातात बेल्ट घेवून तरुणी त्याला चोप देताना दिसत आहे.
Viral Video News
Viral Video NewsSaamtv
Published On

Teen Sisters Thrash Molester On Road Viral Video News: देशांमध्ये महिला अत्याचाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. देशभरातून मुलींच्या छेडछाडीच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.

गुजरातमधील (Gujrat Viral Video) अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका रोडरोमियाच्या त्रासाला कंटाळून दोघा बहिणींनीच त्याला भररस्त्यात चोप दिल्याचा प्रकार घडला आहे.

Viral Video News
Mumbra Bypass Collapse Crack: मुंबईत मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना; मुंब्रा बायपासजवळ कोसळली दरड, बचावकार्यास यश

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातमधील अहमदाबाद शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रोडरोमिओच्या छेडछाडीला कंटाळून दोन्ही बहिणींनी कायदा हातात घेत त्याला रस्त्यावरच बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हा रोडरोमिओ शाळेत जाणाऱ्या तरुणीला सतत त्रास देत होता. या छळाला कंटाळून अखेर त्यांनी कायदा हातात घेत त्या तरुणाला बेल्ट आणि लाथाने रस्त्यावरच तुडवले.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये नराधम रस्त्यावर पडलेला दिसत असून हातात बेल्ट घेवून तरुणी त्याला चोप देताना दिसत आहे. यावेळी ती त्या रोडरोमिओला गुजराती भाषेत बोलताना दिसत आहे. यावेळी आजूबाजूला बघ्यांची मोठी गर्दीही दिसत आहे.

Viral Video News
Akola News : जागे व्हा...जागे व्हा... शिंदे- फडणवीस सरकार जागे व्हा... तेल्हारा तहसील कार्यालयात शिवसैनिकांचा ठिय्या

हा व्हिडिओ सोशल मीडियावर(Social Media) व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत त्या मुलींच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तसेच अनेकांनी अशा लोकांंना असाच भररस्त्यात धडा शिकवला पाहिजे.. असे म्हणले आहे. तर काही जणांनी पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी अहमदाबादमधील कागदपीठ पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये हा तरुण रोज त्या मुलीची छेड काढत असल्याचा आरोप करण्यात आला असून त्याने तिचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचेही समोर आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com