BHOPAL VIRAL VIDEO: GOATS FOUND INSIDE SCOOTER BOOT SHOCK INTERNET Saam Tv
व्हायरल न्यूज

Video : जुगाड! टॅलेंट भारताबाहेर जायला नको; पठ्ठ्याने २ शेळ्यांना स्कुटीच्या डिक्कीत बसवून गावभर फिरवलं, व्हिडिओ व्हायरल

Bhopal Viral Video : भोपाळमध्ये स्कूटरच्या डिक्कीत दोन बकऱ्या बसवून प्रवास करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले असून काहींनी सुरक्षा बाबत चिंता व्यक्त केली आहे.

Alisha Khedekar

  • भोपाळमध्ये स्कूटरच्या डिक्कीत बकऱ्या घेऊन जाण्याचा व्हिडिओ व्हायरल

  • ‘भैयाजींचा जुगाड’ म्हणून सोशल मीडियावर चर्चेचा विषय

  • लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या, पण काहींनी सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले

  • प्राण्यांना अशा प्रकारे वाहून नेणे धोकादायक ठरू शकते

शहरातील रस्त्यांवर नेहमीच काही ना काही हटके पाहायला मिळतं. भोपाळमधील एअरपोर्ट रोडवर घडलेली एक भन्नाट घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी दिसलेलं दृश्य मात्र सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून गेलं आहे. एका स्कुटीच्या डिक्कीमध्ये २ शेळ्या बसलेल्या पाहायला मिळाल्या. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एक तरुण आपली इलेक्ट्रिक स्कूटर अगदी आरामात चालवत होता. सुरुवातीला आजूबाजूने जाणाऱ्यांना त्याच्या स्कूटरची डिकी उघडी असल्याचं दिसलं. पण जसं कॅमेरा जवळ गेला, तसं दृश्य पाहून सगळेच थक्क झाले. त्या स्कूटरच्या डिक्कीत दोन लहान बकऱ्या अगदी आरामात बसलेल्या होत्या. या बकऱ्या अगदी शांतपणे प्रवासाचा आनंद घेत असल्यासारख्या दिसत होत्या. जणू काही त्या एखाद्या महागड्या गाडीच्या सनरूफमधून बाहेर डोकावत आहेत, असं दृश्य होतं. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या व्यक्तीलाही आपलं हसू आवरता आलं नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर ‘भैयाजींचा जुगाड’ या नावाने जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत कंपनीला टॅग केलं आहे. “हेल्मेट ठेवायला जागा दिली होती, पण भोपाळकरांनी ती बकऱ्यांच्या पिलांसाठी वापरली,” अशा कमेंट्स सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. तथापि, या व्हिडिओवर काही जणांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अशा प्रकारे प्राण्यांना वाहून नेणे धोकादायक ठरू शकते.

अचानक ब्रेक लागल्यास किंवा अपघात झाल्यास बकऱ्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे लोक या व्हिडिओवर खळखळून हसत असले, तरी दुसरीकडे सुरक्षिततेचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र, भोपाळकरांची कल्पकता आणि हटके शैली पुन्हा एकदा या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार ट्रेंड करताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नरसापूर प्रकरणात छत्रपती शिवाजी राजेंच्या काळातील चौरंग करण्याची शिक्षा दिली पाहिजे, रितेश देशमुखची कारवाईची मागणी

Cucumber Benefits For Face: उन्हाळ्यात चेहऱ्यावर काकडीचा असा करा वापर, पार्लरमधील महागडे फेशियल विसरून जाल

Nagraj Manjule: 'खाशाबा' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात; अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर कोर्टाकडून मंजुळेंना नोटीस, काय आहे प्रकरण?

Raja Shivaji: राजा शिवाजी चित्रपटाचं शूटिंग महाराष्ट्रात कुठे झालंय? ही ४ ठिकाणं तुम्हाला माहितीयेत का?

Baby Haircut History: बाळाचे केस कापल्यावर डोक्यावर पेढे किंवा साखर का टाकतात? धार्मिक आणि भावनिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT