Women Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Bhiwandi News : रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता? महिला स्कूटी घेऊन आली अन् थेट खड्ड्यात पडली, धक्कादायक VIDEO

Women Fall On Road Viral Video: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्डे कुठे आहेत, हे समजत नाही. रस्त्यावरील खड्डे न दिसल्यामुळे एक महिला स्कूटीवरुन जोरात खाली पडली आहे. याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

Siddhi Hande

सध्या राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्यात घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यायची असते. पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडतात. खड्ड्यांमुळे अनेकदा पाय घसरुन अनेकजण पडतात. त्याचसोबत दुचाकीवरुन जाणाऱ्या लोकांना पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकदा पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच घटना भिवंडी वाडा- मनोर येथे घडली आहे. येथे रस्त्यावर काम सुरु आहे. याच रस्त्यावरुन पावसात जात असताना एका महिला दुचाकीवरुन पडली आहे.

भिवंडी-वाडा- मनोर महामार्गावर काम सुरु आहे. यामुळे रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्याने बाईकचालक आणि कारचालक पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचते. याच पाण्याचा अंदाज न आल्याने एक महिला स्कूटीवरुन पडली आहे. महिला पाण्याने भरलेल्या रस्त्यावरुन जात होती. महिला स्कूटीने हळूहळू पुढे जात होती. परंतु अचानक खाली खड्डा असल्याने ती महिला जोरात खाली पडली. या रस्त्यावर पाणी साचले असल्याने खालील पाण्याचा अंदाज आला नाही, म्हणून ही दुर्घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत महिला पावसातून स्कूटी घेऊन जाताना दिसत आहे. रस्त्यात अचानक खड्डा आल्याने तिला तोल सावरता येत नाही. त्यामुळे महिला खाली पडते. महिला खाली पडल्यानंतर आजूबाजूचे लोक तिला मदत करण्यासाठी पुढे आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. पाऊस पडत असल्याने वाहनांचा वेगदेखील जास्त नव्हता म्हणून ही महिला सुखरुप आहे. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : उच्च रक्तदाब असेल तर शरीरात नेमके काय काय बदल होतात? जाणून घ्या

Mumbai To Vani Travel: वणी गडचा वळणदार घाट अन् नयनरम्य डोंगरमाथा, सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला कसं जाणार?

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Bigg Boss फेम अभिनेत्रीचा मराठमोळा साज, दागिन्यांसह सौंदर्याने वेधले लक्ष

Uddhav Thackeray: दिवाळीपूर्वी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाका; उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान|VIDEO

SCROLL FOR NEXT