Maha Kumbh 2025 Saam tv
व्हायरल न्यूज

Maha Kumbh 2025 : गर्लफ्रेंडला वश कसे कराल? महाकुंभ मेळ्यातील सुंदर साध्वीने तरुणांना सांगितला मंत्र,VIDEO

Maha Kumbh 2025 update : गर्लफ्रेंडला वश करण्यासाठी महाकुंभ मेळ्यातील सुंदर साध्वीने तरुणांना मंत्र दिला आहे. या सुंदर साध्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Vishal Gangurde

Maha Kumbh 2025 : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. महाकुंभ मेळ्यासाठी देशाच्या काना कोपऱ्यातून लोक आले आहेत. या महाकुंभ मेळ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या महाकुंभ मेळाव्यादरम्यान एका 'सुंदर साध्वी' चर्चेत आली आहे. या सुंदर साध्वीने गर्लफ्रेंडला वश कसं कराल, हा मंत्र तरुणांना दिला आहे. या साध्वीचा व्हिडिओ कमाल खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

कमाल खानने एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत व्हिडिओ शेअर केला आहे. महाकुंभ मेळ्यादरम्यान एक सुंदर साध्वी चर्चेत आली आहे. हर्षा असे या सुंदर साध्वीचे नाव आहे. तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'हरहर महादेव, जय श्रीराम अनेक जण मला मेसेज आणि कमेंट करत आहेत. ते म्हणत आहेत की, 'मला माझ्या प्रेयसीला वशमध्ये करायचं आहे, आम्ही कोणासोबतही लग्न करू, आम्ही तिच्यापासून कधी वेगळे होणार नाही'. यासाठी काय करू'.

या व्हिडिओमध्ये हर्षा पुढे म्हणाली, 'आज तुम्हाला एक मंत्र सांगत आहे की, या मंत्रामुळे गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला वशमध्ये करू शकता. ती व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. तो व्यक्ती तुमची प्रत्येक बाब ऐकून घेईल. व्हिडिओमध्ये हर्षा म्हणते की, 'ओम गीली गीली छू, ओम भट स्वाहा, तुम्हाला दिवसाला एक हजार आठ वेळा या मंत्राचा जप करावा लागणार आहे.

केआरकेने पोस्ट केलेल्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले की, 'व्हायरल होण्यासाठी मॅडम खूप प्रयत्न करत आहेत. तसेच केआरकेने आणखी पोस्ट केली आहे. त्यात कॅप्शनमध्ये म्हटले की, 'या साध्वीला 'देशद्रोही २' मध्ये एका रोलसाठी ऑफर करतो'.

दरम्यान, हर्षा ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. हर्षा रिछारिया असे तिचे नाव आहे. माहितीनुसार, ती मागील दोन वर्षांपासून साध्वी झाली आहे. या साध्वीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. हर्षा ही गुरु आचार्य महामंडलेश्वर स्वामी श्री कैलासानंद गिरी महाराज आणि निरंजनी आखाड्याशी जोडली गेलेली आहे. हर्षा ही मॉडेल आणि सेलिब्रिटी अँकर देखील होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या फोटोवर जादूटोणा? मोदींच्या फोटोजवळ हळद-कुंकू, लिंबू आणि नारळ; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT