
महाकुंभ मेळा २०२५ ला आजपासून औपचारिक सुरुवात झाली. आज सकाळीच सुमारे ४० लाख भाविकांनी प्रयागराज येथील त्रिवेणी संगम आणि आसपास बांधलेल्या घाटांवर स्नान केले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगभरातून भाविक याठिकाणी स्नान करण्यासाठी येत आहेत. उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे की, यावर्षी ४५ कोटींहून अधिक भाविक महाकुंभला येऊ शकतात.
अभूतपूर्व भव्यता आणि दिव्यतेमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन केले जात असून यावेळी अधिक प्रचारामुळे भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या ४५ दिवसांच्या महाकुंभ मेळ्यामध्ये कोट्यवधी भाविक जमणार असून याठिकाणी सर्व आखाड्यांची केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. नागा साधू, जुना आखाड्याचे संत, उदासीन आखाड्याचे साधू यांच्यासह अध्यात्मिक जगतातील विद्वान मोठ्या संख्येने कुंभमेळ्यामध्ये पोहचले आहेत.
१. महाकुंभ मेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने खूपच चांगली व्यवस्था केली आहे. कुंभमेळा आणि आसपासच्या परिसरात सुमारे ४० हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय १२० मीटरपर्यंतच्या उंचीवर ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. हे ड्रोन महाकुंभमेळ्याची अप्रतिम फोटो दाखवत आहेत.
२. मेळ्यात २७०० कॅमेरे लावण्यात आले असून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये फेशियल टेक्नॉलॉजी असून ते मोठ्या प्रमाणात प्रवेशद्वारांवरही बसवण्यात आले आहेत. याशिवाय शहरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सायबर हेल्प डेस्कही तयार करण्यात आले आहेत. महाकुंभ मेळ्याशी संबंधित धमक्यांची माहिती घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. या कामासाठी एकूण ५६ सायबर वॉरियर्स तैनात करण्यात आले आहेत.
३. प्रशासनाने भाविकांना राहण्यासाठी सुमारे दीड लाख तंबूही लावले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात शौचालये बांधण्यात आले आहेत.
४. जत्रा परिसरात ४ लाख ५० हजार वीज कनेक्शन देण्यात आल्या आहेत. महिन्याभरात १ लाख अपार्टमेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या महाकुंभात एवढी वीज वापरली जाईलअसा अंदाज आहे.
५. कुंभमेळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या प्रवासासाठी देखील खास सोयी करण्यात आली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेसही लावण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर राज्य सरकारने यूपीच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या अनेक गॅलरीही उभारल्या आहेत.
६. भारतीय रेल्वेने महाकुंभासाठी ९८ विशेष ट्रेन चालवल्या आहेत. अनेक ट्रेनचे मार्ग प्रयागराजपर्यंत वाढवले जात आहेत. महाकुंभ दरम्यान विशेष ट्रेन एकूण ३३०० फेऱ्या करणार आहेत.
७.महाकुंभाच्या तयारीसाठी प्रयागराज शहरालाही नवसंजीवनी देण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये ९२ रस्ते नव्याने बांधण्यात आले आहेत. ३० पूल बांधण्यात आले असून ८०० बहुभाषिक बॅनर लावण्यात आले आहेत.
८. एवढेच नाही तर मेळ्याच्या आवारात २३ तात्पुरती रुग्णालयेही तयार करण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून एक्स-रे, स्कॅन यासारख्या चाचण्यांसोबतच शस्त्रक्रियेचीही व्यवस्था आहे.
९. महाकुंभसाठी AI तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. सहआयाक चॅटबॉट लाँच करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना महाकुंभ मेळ्याची माहिती सहज मिळू शकेल आणि संपूर्ण मार्गदर्शन मिळेल.
१०. भारतीयांसोबतच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया यांसारख्या इतर देशांतील नागरिकही महाकुंभ मेळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. ॲपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन्स पॉवेल जॉब्स या देखील महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.