Mahakumbh: १३ वर्षाच्या मुलीला दीक्षा देण्यावरून जुना आखाडामध्ये वाद; महंतांवर कारवाई

Juna Akhara Controversy: जुना आखाड्याने 13 वर्षीय अल्पवयीन आणि त्याचे गुरू महंत कौशल गिरी यांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. आखाड्याच्या नियमांनुसार २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांना प्रवेश दिला जात नाही.
 Juna Akhara  Controversy Over  13 Years Old Girl
Juna Akhara ControversyAj tak
Published On

जुना आखाड्याने 13 वर्षीय अल्पवयीन आणि तिचे गुरू महंत कौशल गिरी यांना नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. आखाडाच्या नियमांनुसार २५ वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलेला आखाड्यात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे आखाडाच्या श्रेष्ठींनी महंतांवर कारवाई करण्यात आलीय. तर मुलीला सम्मानपूर्वक तिच्या आई-वडिलांकडे पाठवलंय.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील जुना आखाड्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला संन्यासी होण्यासाठी आखाड्यात प्रवेश देण्यात आला होता. परंतु हे आखाड्याच्या नियमांविरोधात असल्याचं म्हणत मुलीला आखाड्यातून काढून टाकण्यात आले आहे.आखाड्याच्या नियमांनुसार २५ वर्षांखालील महिलांना प्रवेश देता येत नाही, अशी माहिती जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते महंत नारायण गिरी यांनी शनिवारी दिली. शुक्रवारी झालेल्या आखाड्याच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा झाली.

अल्पवयीन मुलीला प्रवेश दिल्याने मुलीचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. महंत कौशल गिरी महाराज यांची सात वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले. नारायण गिरी यांनी सांगितले, अल्पवयीन मुलीला पूर्ण सन्मानाने तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जुना आखाड्याच्या नियमांनुसार २५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांनाच आखाड्यात सामावून घेता येईल.

 Juna Akhara  Controversy Over  13 Years Old Girl
Mahakumbh 2025: महाकुंभात पोहोचले 'धान्य बाबा', साधू बुवाने डोक्यावरच पिकवली गहू, हरभऱ्याची शेती

परंतु जर आई-वडिलांनी अल्पवयीन मुलीला आखाडाला दान दिलं असेल तर तिला आखाड्याच्या नियमांनुसार तिचा समावेश केला जाऊ शकतो. १३ वर्षाच्या मुलीला आखाड्यात प्रवेश द्यायचा किंवा नाही, यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जुना आखाडाचे संरक्षक महंत हरी गिरी, अध्यक्ष श्रीमहंत प्रेम गिरी आणि अन्य वरिष्ठ संत उपस्थित होते. बैठकीत आखाड्याला न सांगता अल्पवयीन मुलीला दीक्षा देणाऱ्या महंत कौशल गिरी यांच्यावर संतांनी नाराजी व्यक्त केली होती.

 Juna Akhara  Controversy Over  13 Years Old Girl
Viral Videos : भगव्या रंगाची कार, गाडीला आईचा दर्जा अन् ३५ वर्षांपासून सोबत, कुंभमेळ्यात चर्चेत आलेले 'ॲम्बेसेडर बाबा' कोण आहेत?

मुलीची आई रिमा सिंह म्हणाल्या की, महंत कौशल गिरी महाराज हे मागील तीन वर्षांपासून त्यांच्या गावात भागवत कथा सांगण्यासाठी येत असतात. तेथेच त्यांच्या १३ वर्षाच्या मुलीने रेखा सिंहने (आता तिचं नाव गौरी गिरी आहे) गुरुजीकडून दीक्षा घेतली. त्यांच्या मुलीने संसाराची मोह-मायाचा त्याग करायचा आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी ही देवाची इच्छा असावी, अस म्हणत त्यांनी मुलीला जुना आखाड्यात जाण्यास परवानी दिली होती. महंत कौशल गिरी यांनी रेखाला दीक्षा देत तिला गौरी गिरी नाव दिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com