Bharat Jadhav
भारतीय लोक श्रद्धेचे प्रतीक असलेल्या महाकुंभला आजपासून सुरू झालं आहे.
संगम घाटावर साधूंपासून भाविकांची मोठी गर्दी आधीच दिसून येत आहे.
या महाकुंभ मेळ्यात आलेल्या नागा साधूंबाबत प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न आहेत.
नागा साधूंबाबत अनेक अशा गोष्टी आहे ज्या आपल्याला माहिती. साधूचे जीवन खूप रहस्यमय आहे.
इतर साधूंप्रमाणे नागा साधू देखील शुद्ध शाकाहारी आणि सात्विक भोजन घेतात.
नागा साधू दिवसातून एकदाच खातात. त्यांचे अन्न परमार्थावर अवलंबून असते.
नागा साधू एका दिवसात फक्त 7 घरांमधून अन्न मागू शकतात. या घरांमधून जे काही मिळते तेच त्यांचे अन्न असते.
नागा साधूंच्या आहारात कंदमुळे, औषधी वनस्पती, फळे, फुले आणि पाने इत्यादी असतात.