Saam Tv
जिद्द आणि चिकाटीने काम कराल एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर येऊन पडेल. पण ती उत्तमरीत्या पार पाडावी लागेल.
कौटुंबिक जीवनामध्ये आनंद मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. दिवस संमिश्र आहे.
आज कामे सुयोग्य दिशेने पार पडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. मनासारख्या घटना घडल्यामुळे मन मोरपीसा सारखे हलके होईल.
वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्या. मनस्वास्थ्य जपणे हे आज महत्त्वाचे आहे.
महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. परदेशी वार्तालाप होतील. स्नेहीजनांचा सहवास लाभेल.
तुमचे कार्यक्षेत्र आज क्षितिज गाठणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. माणसांना जोडण्याची कला साधाल.
शासकीय कामे मार्गी लागण्याचा आजचा दिवस आहे. त्यासाठी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मोठे निर्णय होतील.
आज कोणालाही जामीन राहू नका. राहत्या जागेचे प्रश्न सुद्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे हे आज जाणवेल.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.आपल्या मतांविषयी आज आग्रही राहाल. कोर्टाची कामे सुरळीत होतील.
शासकीय कामे रखडतील. हितशत्रूंचा त्रास होईल. नको त्या कटकटी मागे लागल्यामुळे मनस्वास्थ्य बिघडेल.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात त्यांची प्रगती होईल. शिव उपासनामुळे धनदायक घटना आज घडतील.
तुमचे निर्णय आणि अंदाज आज अचूक ठरणार आहेत. योग्य व्यक्तींच्या योग्य वेळी गाठीभेटी होतील. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.