Bike Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Bike Viral Video : हायवेवर भरधाव वेगात ३ वर्षांच्या चिमुकल्याने चालवली बाईक; थरारक व्हिडीओ व्हायरल

3 Year Old Boy Rode a Bike : यामध्ये चिमुकला दुचाकीवर आपल्या बाबांसोबत बसला आहे. आता बाबा त्याला घरी नेत आहेत की तो बाबांना घरी नेत आहे असा प्रश्न व्हिडिओ पाहिल्यावर मनात येत आहे.

Ruchika Jadhav

Viral Video :

सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजात अगदी धस्स होतं. लहान मुलांना अगदी डोळ्यात तेल घालून सांभाळावं लागतं. ते कधी काय करतील याचा काहीच भरवसा नसतो. अशात सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. या म्हणीचा अर्थ सांगणारी अनेक उदाहरणे देखील पहिली असतील. अशाच एका चिमुकल्या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चिमुकला दुचाकीवर आपल्या बाबांसोबत बसला आहे. आता बाबा त्याला घरी नेत आहेत की तो बाबांना घरी नेत आहे असा प्रश्न व्हिडिओ पाहिल्यावर मनात येत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा लहान मुलगा आपल्या बाबांसोबत दुचाकीवर बसून स्वतःच दुचाकी चालवत आहे. त्याचे बाबा त्याच्या मागे आरामात बसले आहेत. या घटनेचा व्हिडिओ शेजारी जाणाऱ्या एका व्यक्तिने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. बाबा हाताची घडी करून चिमुकल्या मुलाच्या मागे बसलेत. पहिल्यांदा व्हिडिओ पाहून अनेकांना डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण जात असेल.

सोशल मीडियावर viral_noon या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काहींनी या चिमुकल्या मुलाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

वाहतुकीचे नियम प्रत्येकवेळी आणि प्रत्येक ठिकाणी पाळणे गरजेचं आहे. मात्र काही व्यक्ती वाहतुकीचे नियम सर्रास ढाब्यावर बसवतात. या व्यक्तीने देखील आपल्या मुलासोबत ही स्टंटबाजी केलीये. जर चिमुकल्या मुलाचा तोल गेला असता तर मोठा अनर्थ घडला असता.

या आधी देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये दुचाकीच्या मागच्या सीटवर एक व्यक्ती वनसाईड बसला होता. दुचाकी हायवेला जोरदार पळत होती. मात्र गाडी चालवणारा ड्रायव्हरच येथे नव्हता. ड्रायव्हर नसताना देखील ही दुचाकी सुसाट पळत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

Actress Accident: चालत्या गाडीवर रॉकेट आला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थोडक्यात जीव वाचला

SCROLL FOR NEXT