Viral VIdeo News Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: एकदम भन्नाट! तब्बल ७९ वर्षांनंतर भरवली शाळा; १९५४ च्या बॅचची धमाल, VIDEO चुकवू नका...

School Friends Meet After 79 Years Video: व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येकाचे वय ७०, ८० च्या आसपास असेल.. पण त्यांचा डान्स आणि धमाल अगदी वय विसरायला लावणारा आहे.

Gangappa Pujari

Old School Friends Viral Video: आयुष्यातले सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय ठिकाण म्हणजे आपली शाळा. प्रत्येकाच्या आयुष्यात, त्याच्या जडण घडणीत शाळेतल्या दिवसांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच प्रत्येकाच्या ह्रदयाच्या कप्प्यात शाळेतल्या असंख्य आठवणी जपून ठेवलेल्या असतात. आयुष्यात मोठे झाल्यावर आपल्याला हे दिवस नेहमी आठवत राहतात.

पण जर, आपल्या म्हातारपणीचं पुन्हा शाळेतले सोबती मिळाले आणि पुन्हा शाळा भरली तरं. ऐकताच छान वाटणारी ही कल्पना पुणेकरांनी सत्यात उतरवली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे हा व्हायरल व्हिडिओ, चला जाणून घेवू.... (Viral Video News In Marathi)

सर्वात सुंदर शाळेतले दिवस...

आयुष्यात कितीही मोठे आणि यशस्वी झालो तरी शाळेतल्या दिवसांत केलेली मजा पुन्हा अनुभवायला मिळणे अशक्यचं. शाळेत केलेली मस्ती, शिक्षकांचा खालेल्ला मार, बुडवलेले तास आणि ते खेळ. असंख्य आठवणी आपल्या शाळेबद्दल सांगता येतात. हेच दिवस पुन्हा जगण्यासाठी अनेकवेळा स्नेह संमेलनांचे आयोजनही केले जाते.

स्नेह संमेलनाचा व्हिडिओ...

सध्या अशाच एका स्नेह संमेलनाचा जोरदार व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही आजी आजोबा ग्रूप धमाल मस्ती करताना दिसत आहे. हो आजी आजोबाच, कारण हा शाळेचा गृप १०, २० वर्षांनी नाही तर तब्बल ७९ वर्षांनंतर एकमेकांनी भेटला आहे.

१९५४ च्या बॅचचा गेट टू गेदर...

या व्हायरल व्हिडिओला दिलेल्या कॅप्शननुसार हा १९५४ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेसलन सोहळा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये आजी आजोबा धमाल मस्ती डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा उत्साह अगदी तरुणाईला लाजवेल असाच आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येकाचे वय ७०, ८० च्या आसपास असेल.. पण त्यांचा डान्स आणि धमाल अगदी वय विसरायला लावणारा आहे.

धमाल अन् मस्ती....

या व्हिडीओमध्ये (Viral Video) झळकणारे आजी-आजोबा हे १९५४ साली १० वी उत्तीर्ण झाले होते. आज ते तब्बल ७९ वर्षानंतर एकमेकांची भेट घेत आहेत. त्यांनी आपल्या पूर्ण बॅचचं पुण्यामध्ये रियुनियन केलं आहे. या व्हिडीओमध्ये ते आनंदाने नाचताना, गाणी गाताना दिसत आहेत.

जबरदस्त प्रतिक्रिया....

हा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांच्याही शाळेच्या आठवणी जाग्य झाल्याचे सांगितले आहे. तर काही जणांनी हा व्हिडिओ पाहून पुन्हा शाळेत जावू वाटत असल्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून प्रत्येकाने या जबरदस्त कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

SCROLL FOR NEXT