Smashanbhoomi Viral Video: Woman Climbing Shed Debunked as Hoax Saam Tv
व्हायरल न्यूज

Smashanbhoomi Ghost Video: संभाजीनगरच्या स्मशानभूमीत भूत? रात्री स्मशानभूमीत भूत फिरतंय?

Viral Crematorium Ghost Video Investigation: स्मशानभूमीत भूत फिरतंय...होय, स्मशानातील भूतांचा व्हिडिओ समोर आलाय...भूत फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भीतीचं वातावरण पसरलंय...पण, खरंच भूत स्मशानभूमीत फिरतायत का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

स्मशानभूमीत पत्र्याच्या शेडवर एक महिला चढत असल्याचा हा व्हिडिओ आहे...रात्री 12 वाजता स्मशानभूमीत भूत फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय...कुणीही रात्री स्मशानभूमीत जाऊ नका, भूत फिरतंय असा दावा करण्यात आलाय...हा व्हिडिओ आता व्हायरल होत असल्याने भीती निर्माण झालीय...पण, या व्हिडिओत दिसतंय ते खरं आहे का...

हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय...कारण व्हिडिओत महिला पत्र्याच्या शेडवर चढत असताना व्हिडिओ बनवणारी व्यक्ती बोलताना दिसतेय...या महिलेचे पाय उलटे आहेत, आणि ती वरती वरती जातेय असं ही व्यक्ती बोलताना आवाज ऐकू येतोय...त्यामुळे या व्हिडिओवर अनेकांना विश्वास बसू लागलाय...हा व्हिडिओ संभाजीनगरातील असल्याचा दावा केलाय...याची आम्ही पडताळणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी थेट स्मशानभूमीत पोहोचले...आणि खरंच रात्री भूत फिरताना पाहिलंय का हे स्मशानभूमीत काम करणाऱ्यांकडून जाणून घेतलं...

यांच्या 5 पिढ्या स्मशानभूमीत राहिल्यायत...मात्र, त्यांना कधीही असा प्रकार पाहिला नसल्याचं सांगितलंय...तरीदेखील आम्ही अंनिसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली...आणि याव्हिडिओबद्दल अधिक माहिती जाणून घेतली... भूत आहे हे सिद्ध केल्यास 25 लाखाचे बक्षीस देऊ असं अंनिसने जाहीर केलंय...

भूताचा व्हिडिओ तयार करण्यात आलाय

भीती निर्माण करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल

भूत या जगात अस्तित्वातच नाही

समाजकंटकांकडून अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न

जगात कुठेही भूत नाही...भीती निर्माण करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातायत...त्यामुळे आमच्या पडताळणीत स्मशानभूमीत भूत फिरत असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

Yuzvendra Chahal: भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची झालीये लागण

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आधी ४२०ची केस आता घर आणि रेस्टॉरंटवर इनकम टॅक्सचा छापा, पण...

SCROLL FOR NEXT