Accident Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Accident Video: फूटपाथवरून चालणाऱ्या व्यक्तींना भरधाव कारने उडवलं; भीषण अपघाताचा थरार CCTVत कैद

Viral Cctv Footage Video: रस्त्यावरुन चालणाऱ्या दोन व्यक्तींना भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आहे.सध्या या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shocking Accident Video

रस्त्यावरुन चालणाऱ्या दोन व्यक्तींना भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती,की यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक गंभीररित्या जखमी आहे. थरकाप उडवणारी ही घटना दिल्लीमधील असल्याचे समजते. सध्या या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे. कधी वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे तर कधी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे अनेक नाहक व्यक्तींचा जीव गेला आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमच्या ही आगांवर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, व्हिडिओत एक तरूण आणि एक तरुणी दिसत आहेत. रस्त्याच्या एका फुटपाथवरून दोघेही चालत जात आहे. तेवढ्यातच रस्त्यावरुन एक निळ्या रंगाची भरधाव वेगात एक कार येते आणि त्यांना जाऊन धडक मारते. त्यानंतर लगेचच परिसरातील लोक तिथे जमा होतात. ही धडक इतकी भिषण होती की या अपघातात एकाची जागीच मृत्यू होतो तर एक गंभीररित्या जखमी झाले आहे.

या अपघाताचा सर्व थरार जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सोशल मीडिया एक्सवरील @priyarajputlive या एक्सअकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा अपघात दिल्लीतील झाल्याचे समजते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून सोशल मीडिया यूजर्संनी अनेक प्रतिक्रिया केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Maharashtra News Live Update: राजापूर रेल्वे स्थानकावर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी कोकणवासीयांची गर्दी

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT