Honey bee Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

HoneyBee Viral News: 'या' देशात मधमाशांचे होत आहे अपहरण! 12 वर्षात 10 लाख माशा गायब, कारण जाणून व्हाल थक्क!

Honey bee Viral News: 'या' देशात मधमाशांचे होत आहे अपहरण! 12 वर्षात 10 लाख माशा गायब, कारण जाणून व्हाल थक्क!

Satish Kengar

Honey bee Viral News: आजपर्यंत तुम्ही लोकांचे अपहरण झाल्याचे ऐकले असेलच. कधी परस्पर वैमनस्यातून तर कधी मानवी तस्करीसाठी एखाद्या व्यक्तीचे अपहरण होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

यामध्ये लहान मुलांच्या अपहरणाची प्रकरणे देखील समोर येतात. मात्र ब्रिटनमधून एक आगळीवेगळी बातमी समोर येत आहे. येथे चक्क मधमाशांचे अपहरण केले जात असल्याच्या घटना घडत आहेत.

होय, तुम्ही जे वाचलं आहे, ते बरोबर आहे. या देशात मधमाशांचे अपहरण होत आहे. 2011 पासून येथे 10 लाखांहून अधिक मधमाशांचे अपहरण झाले आहे. तसेच सुमारे 135 मधमाश्यांचे पोळे चोरीला गेले आहेत.

या अपहारांमुळे वर्षानुवर्षे मधमाशी पालन करणाऱ्या अशा अनेक शेतकऱ्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागत आहे. मधमाश्या गायब झाल्यामुळे मध तयार होत नसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे.  (Latest Marathi News)

अनेक शेतकऱ्यांनी व्यवसाय केला बंद

मधमाश्यांच्या अपहरणामुळे अनेकांना मधाचा व्यवसाय बंद करावा लागला. स्किडब्रुक, लिंक्स येथे राहणारे 60 वर्षीय गाए विल्यम्स यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षांत त्यांच्या अनेक मधमाशांचे अपहरण करण्यात आले. राणी मधमाशी गायब होताच बाकीच्या मधमाश्याही नाहीशा होतात.

ते म्हणाले की, हे अपहरणकर्ते अतिशय हुशार आहेत. मध उत्पादन फक्त मधमाशांच्या मदतीनेच होऊ शकते, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते मधमाशांचे अपहरण करत आहेत. आतापर्यंत या अपहरणकर्त्यांचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. मात्र अनेक वर्षांपासून तपास सुरू आहे. (Viral Video) 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pen Fort : इतिहासप्रेमी अन् ट्रेकर्ससाठी पर्वणी! पेणजवळील 'या' ५ किल्ल्यांची सफर तुम्हाला नक्की आवडेल

Protein Supplements: प्रोटीन सप्लीमेंटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तींना असतो धोका

Ramayana Collection : रणबीर कपूर-यशच्या 'रामायण'ची जगभरात धूम! १,११० कोटींची कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड

Shocking : मोठी बातमी! भाजप नेत्याच्या धावत्या कारला भीषण आग; दोघांनी कारमधून उडी मारली अन्...

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळी परिस्थितीत अमरावतीत नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर ओली पार्टी रंगली

SCROLL FOR NEXT