coffee adulteration Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

coffee adulteration : आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची... तुम्ही आवडीने कॉफी पित असाल तर सावधान... तुम्ही पित असलेल्या कॉफीत शेण तर नाही ना याची खात्री करा... कारण एक मेसेज व्हायरल होतोय त्यात कॉफीत शेणाचे अंश आढळल्याचा दावा करण्यात आलाय... त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली मग काय सत्य समोर आलं पाहुयात...

Vinod Patil

तुम्ही कॉफी पित असाल तर हा दावा पाहून तुम्ही कॉफी पिणं सोडून द्याल... कॉफीत शेणाचे अंश आढळून आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय... हा दावा म्हणजे थेट आरोग्याशी खेळ... बरेच लोक आवडीने कॉफी पितात... सकाळ, दुपार, संध्याकाळ त्यापेक्षाही जास्तवेळ अनेकजण कॉफी पितात... त्यामुळे या दाव्याची सत्यता पडताळून पाहणं गरजेचं आहे... मात्र, त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे की, 1 जानेवारीपासून 30 ऑगस्टपर्यंत राजस्थानमध्ये 16,691 फूड सॅम्पल घेण्यात आले. याची लॅबमध्ये चाचणी केली त्यावेळी यातील 27% पदार्थ भेसळयुक्त आढळले. गंभीर बाब म्हणजे कॉफीत शेणाचे अंश आढळून आले.

हा दावा खळबळजनक आहे... जरी हे राजस्थानमध्ये आढळलं असलं तरी प्रोडक्ट्स देशभरात विकली जातात... त्यामुळे आम्ही तज्ज्ञांकडून कॉफीतली भेसळ कशी ओळखायची हे जाणून घेतलं...

कशी ओळखाल भेसळयुक्त कॉफी?

1 एका काचेच्या ग्लासात पाणी घ्यावं

2 पाण्यात कॉफी टाकून 5 मिनिटं ठेवावी

3 शुद्ध कॉफी पाण्यात पूर्णपणे विरघळते

4 शेण किंवा भेसळ असल्यास गाळ तळाला साचतो

5 कॉफीसारखी दिसणारी चिकोरी पावडर

मिक्स करतात

6 चिकोरी पावडर मिक्स केल्यास पाण्याच्या तळाला जाते.

आता भेसळयुक्त कॉफी कशी ओळखायची ते समजून घेतलं...मात्र,भेसळयुक्त कॉफी आपण प्यायलो तर काय गंभीर परिणाम होऊ शकतात हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं...

व्हायरल सत्य काय?

राजस्थानमध्ये कॉफीत शेणाचे अंश आढळले

महाराष्ट्रात चहा पावडरमध्ये कीटकनाशकं आढळली होती

भेसळयुक्त कॉफी, चहामुळे पोटाचे विकार, उलट्या जुलाब होतात

विषबाधा, लिव्हर, किडनीवर परिणाम होऊ शकतो

आतड्यांवर आणि मूत्राशयाला हानी पोहोचते

त्यामुळे तुम्ही कॉफी पित असाल तर काळजी घ्या... काही बोगस कंपन्या ब्रँडचा वापर करून लोकांच्या जीवाशी खेळतायत... आमच्या पडताळणीत कॉफीत शेणाचे अंश हे राजस्थानमध्ये आढळल्याचा दावा सत्य ठरलाय... महाराष्ट्रात अशा प्रकारे कॉफीत भेसळ आढळलेली नाही... तरीदेखील तुम्ही कॉफी पिताना सावधगिरी बाळगा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसे-शिवसेना युतीचं ठरलं! जागावाटपासाठी ठाकरेंचे ३ शिलेदार सज्ज, घोषणा कधी करणार?

Ratnagiri Tourism : बच्चे कंपनीसोबत दिवाळीत करा किल्ल्यावर भटकंती, रत्नागिरीतील 'हे' ऐतिहासिक ठिकाण पाहाच

Maharashtra Live News Update : - पहिल्या वर्षापासून हिंदी सक्तीला नागपूरातील तज्ज्ञांचा विरोध

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, ३० तासांचा जम्बो ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द अन् लोकलवरही परिणाम

HBD Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन की धर्मेंद्र सर्वात जास्त श्रीमंत कोण? पाहा जय-वीरूच्या संपत्तीचा आकडा

SCROLL FOR NEXT