A viral message claiming the Indian government may impose a ₹1 per GB internet tax has sparked debate among mobile users. Saam Tv
व्हायरल न्यूज

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Viral-Internet Tax Claim India Fact Check: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो... आता इंटरनेट डेटावरही टॅक्स लागणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच इंटरनेटवरही आता टॅक्स लावला जाणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात..

Sandeep Chavan

...तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेटवर आता टॅक्स लागणार आहे...होय, तसा विचार सरकार करत असल्याचा दावा करण्यात आलाय...प्रत्येक जीबीमागे 1 रुपया टॅक्स आकारला जाऊ शकतो असा दावा केलाय...पण, खरंच असा निर्णय सरकार घेणार आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

भारतात मोबाईल इंटरनेट वापरणं भविष्यात महाग होऊ शकतं. सरकार मोबाईल डेटा वापरावर नवीन कर लादण्याचा विचार करतंय.हा मेसेज व्हायरल होत असल्याने युजर्समध्ये नाराजी आहे...कारण, आधीच मोबाईलच्या डेटा पॅकवर टॅक्स दिला जातो...तसंच पोस्टपेड बिलावरही टॅक्स दिला जातो...पण, आता इंटरनेट डेटावरही टॅक्स आकारला जाऊ शकतो का...? या दाव्यात तथ्य आहे का...? कारण, देशभरात कोट्यवधी युजर्स इंटरनेट वापरतात...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी केली...आम्ही अर्थमंत्र्यांनी अशी घोषणा केलीय का...? हे तपासलं...तसंच तज्ज्ञांकडून माहिती मिळवली...

इंटरनेट डेटावर अजूनही टॅक्स लावलेला नाही

भविष्यात टॅक्स लावणं शक्य आहे का यावर विचार सुरू

प्रति GB डेटावर 1 रुपया टॅक्स लावण्याचा विचार

भारतात मोबाईल डेटा मोठ्या प्रमाणात वापरला जातो...त्याचे दुष्परिणामही आहेत...त्यावरही नजर टाकूयात...

इंटरनेटच्या अतिवापराचे तोटे काय?

मोबाईलचा जास्त प्रमाणात वापर होतो

स्क्रीन टाईम वाढल्याने डोळ्यांना त्रास

मोबाईलमध्ये गुंतल्याने झोपेवरही परिणाम होतो

असे दुष्परिणाम आहेत...सरकार मोबाईल डेट्यावर नवीन टॅक्स लावायचा की नाही यावर निर्णय घेईल...सध्या कुणीही ऑफिशियल स्टेटमेंट केलेली नाही...तसंच हा नियम लागू होऊ शकतो असं सांगितलेलं नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत आता सरकार इंटरनेटवरही टॅक्स लावणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

Tuesday Horoscope : आरोग्याची काळजी घ्यावी लागेल; ५ राशींच्या लोकांचा वाढणार मानसिक ताण

मेटाचा युजर्सना मोठा झटका, 8 मे नंतर 'DM' मध्ये 'नो' प्रायव्हसी?

आयसीयूत रुग्णाला उंदरानं कुरतडलं? भाईंदरमध्ये आरोग्यव्यवस्था पोखरलेली

Maharashtra Live News Update: दानवाड संगमावर ३०० वर्षांपूर्वीचा पुरातन घाट सापडला

SCROLL FOR NEXT