दूधात पाणी टाकून किंवा दूध घट्ट व्हावं यासाठी पावडर टाकून भेसळ केली जात असल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र सोशल मीडियावर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यातील दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओत एक दूध विक्रेता गुरे पितात तेच पाणी दुधात मिक्स करून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचं दिसत आहे.
समोर आलेल्या व्हायरल व्हिडिओत दूध विक्रेता गुरांची तहान भागवण्यासाठी असलेल्या एका पाणवठ्याजवळ बताना दिसत आहे. यानंतर आपल्याला कोणी बघत नाही याची खात्री करुन पाणवठ्यातील अशुद्ध पाणी दुधाच्या कॅनमध्ये टाकतो. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील चोरटे भाव लपत नाहीत.
हा दुधवाला आपल्या दुचाकीवरील दोन्ही कॅनमध्ये हे पाणी टाकतोय. आपल्याला कुणी पाहत नाही, असं जरी या दूधवाल्याला वाटत असलं तरी त्याचा हा सगळा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. अमरावतीच्या एमआयडीसी परिसरातील हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियात या डर्टी दूधाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर अन्न आणि औषध प्रशासनाला जाग आलीय.
दरम्यान, चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे दुधाचं सेवन करा असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. लहान मुलांसाठीही दुधासारखा सकस आहार नाही. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दूध विक्रेते कशा प्रकारे तुमच्या जिवाशी खेळतायेत हेच दिसून येतंय. हा व्हिडीओ अमरावतीतला असला तरी दूध भेसळीचे प्रकार सर्रासपणे कुठे ना कुठे पाहायला मिळतात. अशा भेसळखोरांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाकडून कडक कारवाई कधी होणार? हाच खरा सवाल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.