Biscuits Pakoda Viral Video SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Biscuits Pakoda Viral Video: अर्रर्र! मोमोज चहानंतर आता बिस्किट बटाटा वडा..नेटकरी म्हणाले पार वाट लावली, VIDEO तुफान व्हायरल

Food Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. कधी गंमतीदार तर कधी धक्कादायक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Biscuits Pakoda Viral Video

सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. कधी गंमतीदार तर कधी धक्कादायक असे व्हिडिओ आपण पाहत असतो. सोशल मीडिया हा एका असा प्लॅटफार्म बनला आहे ज्याद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीला आपल्यामधील विविध कला दाखवण्याची संधी मिळत असते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यात कधी तो आपल्या स्वयंपाकातील निरनिराळ्या पध्दती दाखवत असतो, तर कधी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची ट्रिक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो. पण सध्या सोशल मीडियावर फुड ब्लॉग बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र काहीजण असे असतात की, नवीन डिश बनवण्याच्या नावाखाली कोणत्याही पदार्थ एकत्र करुन वेगळाच पदार्थ तयार करतात. जे पाहून कधी-कधी काही लोकांची खाण्याची इच्छा निघून जाते. अशातच सोशल मीडियावर एका महिलेने तयार केलेल्या हटक्या चटपटीत पदार्थांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चला तर मग पाहुयात नेमका कोणत्या पदार्थांची चर्चा सोशल मीडियावर होतेय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत सुरुवातीस आपल्याला दिसते की, एक महिला गावाकडील पध्दतीच्या बनवलेल्या स्वंयपाक घरात बसलेली आहे. पहिल्यांदा ती उकडलेल्या बटाट्यांच्या साली काढताना दिसते. त्यानंतर ती एका परातीत बटाटे ठेऊन ते स्मॅश करत आहे, हे झाल्यानंतर चुलीवरच्या कढईतील असलेल्या वाटणात स्मॅश कलेले बटाटे एकत्रीत करते. यानंतर ती एका मोठ्या परातीत बिस्किट ठेऊन बटाट्यांचे तयार केलेले सारण दोन बिस्किट्याच्यामध्ये भरते. बटाट्याचे सारण भरुन झाल्यानंतर बेसनाच्या पीठात बिस्किट टाकून त्यानंतर गरम झालेल्या तेलामध्ये तळण्यासाठी टाकते. बिस्किटबटाटा वडा तयार झाल्यानंतर एका डिशमध्ये चटणीसोबत खाण्यासाठी ठेवते.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा @Cow__Momma या ट्वीटर अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारोच्या घरात व्हूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या युनिक डिश बनवण्याचे फॅड सध्या चर्चेत आहे. कोण कधी काय बनवले याचा नेम नाही. कधी मोमोजचा चहा बनवला जातो तर कधी चॉकलेटची मॅगी. पण आता वडा पाव प्रेमींना बिस्किट बटाटा वडा आवडेल का हे कळू शकले.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्यात. एका यूजर्संनी म्हटल आहे की,'चॉकलेटची मॅगी पेक्षा बिस्किट बटाटा वडा बरा',या व्हायरल व्हिडिओवर अशा प्रकारच्या गमतीदार कमेंटस् आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT