Vishal Gangurde
तुम्ही १० मिनिटात नाश्त्यासाठी मसालेदार फ्रेंच टोस्ट तयार करू शकता.
सुरुवातीला कांदा, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. नंतर ब्रेडचे दोन भाग करा.
एका भांड्यात २ अंडी फोडून टाका. त्यानंतर त्या अंड्यामध्ये तिखट, मीठ आणि दूध घालून फेटून घ्या.
दोन्ही ब्रेड मिश्रणामध्ये बुडवा. त्यानंतर थोडं तेल टाकलेल्या तव्यावर बेक करण्यासाठी ठेवा.
ब्रेड दोन्ही बाजूंनी शिजवून घ्या.
तयार केलेला मसालेदार फ्रेंच टोस्ट हा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये ठेवा.
तुम्ही तयार केलेला फ्रेंच टोस्ट टोमॅटो केचअप किंवा पुदिना चटणीसोबत खाऊ शकता.