Village girl stuns with her soulful dance and expressions on ‘Kahan Dil Kho Gaya’; netizens can’t stop praising her Saam Tv
व्हायरल न्यूज

गावच्या पोरीचा डान्स पाहून नेटकरी झाले फिदा; 'कहां दिल खो गया' गाण्यावर दिले जबरदस्त एक्सप्रेशन्स

Village Girl Dance Video: कहां दिल खो गया या गाण्यावर गावाकडच्या पोरीने केला अफलातून डान्स आणि अभिनय. चिमुकलचं टॅलेंट पाहून अनेकांचं मन जिंकली आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Tanvi Pol

viral dance video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एका गावाकडच्या मुलीने आपल्या अभिनय आणि डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'कहां दिल खो गया' या जुन्या आणि लोकप्रिय हिंदी गाण्यावर तिने सादर केलेला हा व्हिडिओ पाहून अनेकजण भारावून गेले आहेत. तिच्या अभिनयाने आणि सहजतेने केलेल्या नृत्याने नेटिझन्सचं मन जिंकलं आहे.

या डान्स(Dance) व्हिडिओमध्ये दिसणारी ही मुलगी कोणत्याही भव्य स्टेजवर नाही, तर गावातल्या एका शेताकडील परिसरात उभी आहे. आजूबाजूला हिरवळ, शेती आणि साधेपणा असलेल्या पार्श्वभूमीवर ती नृत्य करताना दिसते. तिच्या सोबत अन्य काही चिमुकल्या आहेत ज्याही तिच्या सोबत डान्स करत आहेत. डान्स करताना तिचा आत्मविश्वास, चेहऱ्यावरचा भावनांचा खेळ आणि गाण्याशी समरसून केलेला अभिनय अगदी व्यावसायिक कलाकारालाही लाजवेल असा आहे.

गावाकडील पोरं-पोरींमध्ये टॅलेंट कसं दडलं आहे, हे या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून पुन्हा एकदा स्पष्ट होतं. आधी फक्त शहरांमध्ये संधी मिळायची, पण आता इंटरनेट आणि मोबाइलमुळे गावागावांतील लोकांची कला समोर येतेय. ही मुलगीही त्याचाच एक सुंदर नमुना असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

चिमुकलीच्या डान्समध्ये कुठेही दिखावूपणा नाही. तिच्या हावभावातून गाण्याच्या प्रत्येक ओळीतून भावना प्रकट होतात. 'कहां दिल खो गया' हे 90 चं गाणं असूनही तिचा अभिनय आणि सादरीकरण ते गाणं जिवंत करतं. विशेष म्हणजे ती कुठल्याही महागड्या कपड्यांत नाही सर्व कसं सगळं नैसर्गिक आणि खरं वाटतं.

नेटकरी वर्गाला हा व्हिडिओ प्रचंड आवडलेला आहे. सध्या हा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील chhoti_bristi5631 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे, त्यानंतर असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,''डान्स मध्ये किती साधेपणा आहे'' तर अनेकांनी म्हटलं की,''खुप छान डान्स केला'' अशा प्रकारे अनेकांनी चिमुकलीच्या डान्सचे कौतुक केले आहे.

टीप: हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna Photos: 'काळी बिंदी काळी कुर्ती घालून ...' रश्मिकांच्या लूकने केलं घायाळ

Highest Collection Movie in India: २०२५ मधील आतापर्यंतचे ७ सर्वात मोठे हिट चित्रपट? कोणत्या फिल्मीने केली जास्त कमाई

राज्याच्या राजकारणाला हादरा! सर्व मंत्र्यांनी एकाचवेळी दिले राजीनामे|VIDEO

Mumbai Rain : मुंबई,ठाण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; नागरिकांची उडाली तारांबळ, VIDEO

Madhura Joshi Photos: हाय गर्मी... मधुराच्या फोटोंनी उडवली झोप, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT