वय जरी वाढलं तरी जोश तसाच! 'खाली पीली' गाण्यावर आजोबांचा जबरदस्त डान्स

Senior Citizen Dance Video: बॉलिवूडच्या एका गाण्यावर वयोवृद्ध आजोबांनी दिलेला डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांचा उत्साह, जोश आणि आत्मविश्वास पाहून लाखो लोक प्रभावित झाले असून नेटिझन्स त्यांचं कौतुक करत आहेत.
Senior Citizen Dance Video
Elderly man shows energetic dance moves on ‘Khaali Peeli’ song, wins the internet.Saam Tv
Published On

Grandpa Dance Video: वयोमानाप्रमाणे उत्साह कमी होतो अशी एक सर्वसाधारण समजूत असते. मात्र, सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ या समजुतीला चुकीचा ठरला जातोय. या व्हिडिओमध्ये एका वयोवृद्ध आजोबांचा जबरदस्त डान्स पाहायला मिळतोय. 'खाली पीली' या जोशपूर्ण बॉलिवूड गाण्यावर आजोबा अशा दमदार पद्धतीने थिरकतात की पाहणाऱ्यांना एक क्षणभर तरी विश्वास बसत नाही की ते वृद्ध आहेत.

ही घटना नेमकी कुठे घडली याबाबत स्पष्ट माहिती समोर आली नसली, तरी हा डान्स(Dance) आजोबांनी त्यांच्या मित्रांसमोर केलेला आहे. मित्रांसमोर आजोबा एकटेच उभे राहून जोशात थिरकायला सुरुवात करतात. त्यांचे प्रत्येक स्टेप, हातवारे, आणि चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्यांचे मित्र अक्षरशः हरखून जातात आणि टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देतात.

आजोबांचा डान्स हे जणू एक उदाहरणच ठरतंय की, वय कितीही झालं तरी मन तरुण असेल, तर शरीरही त्याच उत्साहात साथ देतं. डान्स करायला शरीराची लवचिकता लागतेच, पण त्याहून महत्त्वाचं असतं ते म्हणजे मनातला उमंग. आणि हेच या आजोबांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे.

हा डान्स व्हिडीओ(Video) सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर लोक तो शेअर करत आहेत. अनेकांनी व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये आजोबांच्या जोशाचं आणि आत्मविश्वासाचं कौतुक केलं आहे. काही युजर्सनी लिहिलं,''वय हा फक्त आकडा आहे'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं की,''या बाबांचे सर्व डान्स व्हिडिओ भारी असतात''' अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Senior Citizen Dance Video
नाचण्यात आजींचा हात कुणी धरू शकत नाही! पाहा हा धमाकेदार व्हिडीओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com