Four women dressed in Nauvari sarees dance beautifully to the tune of the folk song Dholaki talavar Saam Tv
व्हायरल न्यूज

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Women Group Dance: ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर या पारंपरिक मराठी गाण्यावर चार महिलांनी सादर केलेला नृत्य व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पारंपरिक पोशाख, जबरदस्त ठसका आणि लोककलेची सुंदर झलक पाहायला मिळते.

Tanvi Pol

Dance Viral Video: बऱ्याच वेळेस सोशल मीडियावर वेगवेगळे डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही रील्स पाहिल्यावर केवळ करमणूक होते, पण काही व्हिडिओ मनाला भिडतात, संस्कृतीची आठवण करून देतात. सध्या असाच एक पारंपरिक मराठी गाण्यावर सादर केलेला डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. 'ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर' या गाण्यावर चार मराठमोळ्या महिलांनी दिलेला अप्रतिम नृत्याविष्कार सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या डान्स(DANCE) व्हिडिओतील चार महिलांनी नऊवारी साडी नेसली असून त्यांच्या वेशभूषेतून पारंपरिकतेचा दरवळ जाणवतो. प्रत्येकीच्या कपाळावर कुंकू, नाकात नथ, गळ्यात काळा पोत, केसात गजरा अशा सजलेल्या या महिला मराठमोळ्या सौंदर्याचं जणू सजीव रूप वाटत आहेत. त्यांच्या पोशाखात केवळ सौंदर्य नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा गौरवही आपल्याला दिसून येईल.

सोशल मीडियावर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

व्हिडिओ पोस्ट होताच अल्पावधीतच त्याला हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले. अनेकांनी या व्हिडिओखाली कमेंट करत महिलांचं कौतुक केलं आहे. एका यूजरने म्हटलं आहे की,' 'संस्कृतीला जपणारं सुंदर सादरीकरण'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''या डान्सने मन प्रसन्न झालं'', अशा शब्दांत लोकांनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

हा व्हिडिओ (VIDEO)पहिल्यांदा इन्स्टाग्रामवरील mansi.gawande या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यानंतर तो फेसबूक, ट्वीटर (एक्स) अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे. यापूर्वीही या महिलांचे सुंदर असे डान्स व्हिडिओ नेटकरी वर्गाला प्रचंड आवडलेले होते.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT