Ashish Nehra Kids Crying Video x
व्हायरल न्यूज

Video : मुंबईने गुजरातला हरवलं अन् आशिष नेहराच्या मुलांना धक्का बसला; धाकटा ढसाढसा रडला, तर लेकीने अश्रू लपवले

Ashish Nehra Kids Crying Video : मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात गुजरातचा पराभव झाला. गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलं स्टेडियममध्ये रडू लागली. ही घटना कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली.

Yash Shirke

IPL 2025 चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात मुंबईने २० धावांनी गुजरातचा पराभव केला. या सामन्यादरम्यान आशिष नेहराच्या मुलांचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गुजरातचा संघ पराभूत झाल्याने ते रडू स्टेडियममध्येच रडू लागल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

गुजरात टायटन्सच्या पराभवानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराचा मुलगा आणि मुलगी स्टेडियममध्ये रडत असल्याचे पाहायला मिळाले. नेहराच्या मुलाला धक्का बसला, तो ढसाढसा रडू लागला. नेहराच्या मुलीला देखील दु:ख झाले. ती देखील स्टँडमध्ये रडताना दिसली. पण तिने अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना स्टेडियममधील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली.

गुजरात संघाचा कर्णधार शुभमन गिलची बहीण देखील स्टँडमध्ये होती. तिने नेहराच्या मुलीचे सांत्वन केले. आशिष नेहराचा थोरल्या मुलाला देखील गुजरातच्या पराभवाने दु:ख झाले होते. पण तरीही तो त्याच्या धाकट्या भावाला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. स्टेडियममध्ये हजर असलेले गुजरात टायटन्सचे चाहते देखील नाराज झाले.

काल (३० मे) मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा आयपीएल २०२५ एलिमिनेटर सामना रंगला होता. मुंबईने गुजरातवर मात करुन क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. आता १ जून रोजी पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर २ मध्ये खेळताना दिसतील. त्यातील जो संघ विजयी होईल, तो फायनलमध्ये जाईल.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २२८ धावा केल्या. मुंबईकडून रोहित शर्माने सर्वाधिक ८१ धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. २२९ धावांचे लक्ष्य गाठताना गुजरातचा संघ मैदानात उतरला. गुजरातकडून साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदरने झुंज दिली. पण दोघेही बाद झाल्यानंतर सामना मुंबईच्या बाजूने वळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT