24 Carat Gold Icecream Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : याला म्हणतात A1 दर्जा! बाजारात आली 24 कॅरेट सोन्याची आईस्क्रीम; पाहा VIDEO

Ruchika Jadhav

सध्या देशभरात सोन्याचे आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. महागडे सोन्याचे दागिने करणे अनेक व्यक्तींना परवडत सुद्धा नाही. मात्र लग्न समारंभ किंवा काही महत्वाच्या कार्यक्रमांना आजही सोन्याच्या दागिन्यांना फार महत्व आहे. सोन्याचे आजवर तुम्ही फक्त दागिने पाहिले असतील. मात्र सोनं तुम्ही कधी आहारात खाल्लं आहे का?

सध्या सोशल मीडियावर आईस्क्रीमचा एक जबरदस्त व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सोन्याची आईस्क्रीम विकत आहे. आता ही आईस्क्रीम साधी सुधी नाही हा, थेट 24 कॅरेट सोन्याची ही आईस्क्रीम आहे. ही आईस्क्रीम खाण्यासाठी येथे अनेक खवय्यांनी गर्दी देखील केली आहे.

या व्हिडिओमध्ये आईस्क्रीम कुठे विकली जाते? हा व्हिडिओ कुठला आहे? तसेच या आईस्क्रीमची किंमत किती या सर्वच प्रश्नांची उत्तरे देखील देण्यात आली आहेत. चला तर मग त्याची माहिती जाणून घेऊ.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेशचा आहे. इंदोरच्या सराफा बाजारात प्रकाश कुल्फी अँड फालुदाचं दुकान आहे. येथे ही 24 कॅरेट सोन्याची आईस्क्रीम मिळते. मध्य प्रदेशमध्ये वेगवेगळ्या शहरातून येथे अनेक व्यक्ती ही सोन्याची आईस्क्रीम चाखण्यासाठी गर्दी करत असतात.

आईस्क्रिमची किंमत किती

सोन्याची आईस्क्रीम खायची असेल तर यासाठी तुम्हाला 401 रुपये मोजावे लागणार आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आईस्क्रीम विक्रेत्या व्यक्तीने अंगावर देखील विविध सोन्याचे दागिने परिधान केले आहेत. दोन्ही हातात मोठे ब्रेसलेट, सोन्याच्या अंगठ्या, गाळ्यात 7 ते 8 जाड सोन्याच्या चैनी या व्यक्तीने परिधान केल्या आहेत.

सोन्याची ही आईस्क्रीम मलाईची आहे. त्यावर 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे. @oyehoyeindian या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT