कोमल दामुद्रे
उन्हाळा आला की, अनेकांना थंड पदार्थ खावेसे वाटते. ज्यामध्ये अनेकांना आवडते ती आइस्क्रीम.
अनेकजण आइस्क्रीम खाल्ल्यानंतर अशा अनेक चुका करतात ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. जाणून घेऊया त्याबद्दल
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर अनेकदा तहान लागते. कारण हे साखर आणि सोडियमपासून बनलेले असते.
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नका. यामुळे सर्दी-खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर गरम पदार्थ खाणे टाळावे. यामुळे शरीराला हानी पोहोचते.
संत्री, द्राक्षे किंवा लिंबू सारखी फळे आइस्क्रीम खाल्ल्यानंतर खाऊ नका.
अनेकांना आइस्क्रीम खाल्ल्यानंतर दही खाण्याची सवय असते. असे केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आइस्क्रीम खाल्ल्यानंतर चुकूनही चहा पिऊ नका. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो.