कोमल दामुद्रे
शरीरातील इन्सुलिन असंतुलित झाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. योग्य वेळी यावर उपचार केले नाही तर मधुमेहाचा आजार जडतो.
टाइप -१ आणि टाइप-२ या दोन्ही मधुमेहामध्ये खाण्याच्या सवयींची योग्य काळजी घेऊन निरोगी राहू शकतो. यात काही पदार्थांपासून दूर राहणे गरजेचे आहे.
मधुमेह असलेल्या लोकांनी रिफाइंड पिठापासून बनवलेल्या पदार्थांपासून दूर राहावे. यामध्ये ग्लुकोज असतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
जर तुम्हाला मधुमेह असेल तर जास्त तळलेले पदार्थ खाऊ नका. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची भीती राहाते. तसेच गॅसेसची समस्या उद्भवते.
अनेक वेळा रक्तातील साखर कशी वाढली हे आपल्याला कळत नाही. काही पौष्टिक पदार्थांमध्ये देखील उच्च ग्लायसेमिक असतात ज्यामुळे रक्तातील साखर वाढते.
मधुमेहींनी साखरेसोबत जास्त मीठाचे सेवन करणे टाळावे. यामुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
जर तुम्हाला मधुमेह असेल तर फळांचा रस पिण्याऐवजी फळे खा. कॅन केलेल्या ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्सपासून दूर राहा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा