CCTV Saam Tv
व्हायरल न्यूज

CCTV Footage: चोराची हातचालाखी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; डोळ्याची पापणी लवण्याआधीच iPhone गायब

CCTV Video: वाराणसीत पर्यटकांची नेहमी गर्दी पाहायला मिळते. याच गर्दीचा फायदा अनेक चोर घेतात. एका चोराने दिवसाढवळ्या आयफोन चोरी केला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Varanasi Thief Stlole Iphone13 CCTV Video:

वाराणसी हे पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. तेथील निसर्ग, देवस्थाने पाहण्यासाठी पर्यटकांची खूप गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे चोरी करतात. असाच एक चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाराणसीत पर्यटकांची खूप गर्दी असते. त्यामुळे अनेकदा लहान मुले, वयोवृद्ध माणसे हरवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचसोबत अनेक लोकांचे पैसे, मोबाईल, दागिने अशा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. असाच एका मोबाईल चोरणाऱ्या चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. (Latest News)

व्हायरल व्हिडिओत एक महिलेच्या खिशातून चोराने फोन चोरल्याचे दिसत आहे. व्हिडिओत सर्वप्रथम दोन महिला आणि एक पुरुष एकमेकांशी बोलताना दिसत आहे. एक महिला आपला फोन हातात घेते. त्यानंतर ती फोन खिशात ठेवते. महिलेच्या या सर्व हालचालींवर चोराचे बारीक लक्ष असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अचानक चोर त्या महिलेच्या बाजूला येतो आणि तिच्या खिशातून हळूच मोबाईल काढून घेतो. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

Sarah या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'हा संपूर्ण प्रकार २९ जानेवारी २०२४ ला घडला. मी माझ्या आईवडिलांसोबत वाराणसी ट्रीपला गेली होती. तेव्हा तिथे स्ट्रीट फूड खात असताना अचानक एका चोराने माझ्या खिशातील मोबाईल चोरला. माझा मोबाईल नसल्याचे हे मला थोड्या वेळाने जाणवले. चार महिन्याआधीच मी आयपोन १३ घेतला होता. तो वारामसी नाई सरक चौकातून चोरीला गेला. त्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांत एफआयआर दाखल केली'. असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटकांनी नेहमी सतर्क राहायला हवे, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT