Ganpat Gaikwad Firing CCTV footage: गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण; पोलीस स्टेशनमधील आणखी एक सीसीटीव्ही आला समोर

Ganpat Gaikwad Firing News: काल आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर आला. त्यानंतर आज याच प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आला आहे.
Ulhasnagar firing
Ulhasnagar firing Saam tv
Published On

Ganpat Gaikwad Firing case:

उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमधील गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे. काल आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही समोर आला. त्यानंतर आज याच प्रकरणातील आणखी एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्यानंतर गायकवाड यांना शनिवारी कोर्टाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जागेच्या वादातून गायकवाड यांनी गोळीबार केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याच प्रकरणात गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांच्या मुलगा वैभव गायकवाड यांना धक्काबुकी करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता पोलीस स्टेशनच्या बाहेरील सीसीटीव्ही समोर आला आहे. या व्हिडिओत गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी पाहायाला मिळत आहे. यावेळी पोलीस देखील उपस्थित होते.

गणपत गायकवाड यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर उल्हासनगर-हिल लाईन पोसीस ठाण्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंबरनाथमधील द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणात आमदार गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीख, वि्ठठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकात ओल, मंगेश वारघेट यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वादातून महेश गायकवाड पोलिस ठाण्यात गेले होते. या जागेवरून पोलिस ठाण्यात चर्चा सुरु होती. या चर्चेच्या दरम्यान पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या केबीनमध्ये आमदारांनी महेश गायकवाड यांच्यासह त्याचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर गोळ्या झाडल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com