Viral Video: भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं...; माता रमाईंच्या कार्याची गायली गाथा, तरुणींचा VIDEO तुफान व्हायरल

Ramabai Ambedkar Jayanti: रमाबाई भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी. आज त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक भारतीय नागरिक त्यांना अभिवादन करत आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV
Published On

Ramabai Ambedkar Jayanti Viral Video:

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, हे वाक्य तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं असेल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे माता रमाई. रमाबाई भीमराव आंबेडकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी. आज त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक भारतीय नागरिक त्यांना अभिवादन करत आहे. तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी अनेक गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Viral Video
Arjun Kapoor: आईच्या वाढदिवशी बहिणीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला अर्जुन कपूर, VIDEO पाहून चाहते झाले इमोशनल

माता रमाई यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात बाबासाहेबांना मोठी साथ दिली. त्यांच्या कार्याची गाथा सांगणारा एक रील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन तरुणींनी सुंदर असं गाणं गायलं आहे. रामाचं नांनदनं, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदणं... असे या गाण्याचे बोल आहेत.

या दोन्ही बहिणींनी आजवर बाबासाहेब तसेच माता रमाई यांची अनेक गाणी गायली आहेत. कृतिका बोरकर आणि रसिका बोरकर अशी या दोन्ही बहिणींची नावे आहेत. त्यांचा भाऊ नयन बोरकर याने त्यांना या गाण्यात संगीताची साथ दिली आहे. लयबध्द आणि अगदी तालासुरात या दोन्ही बहिणी गाणं गात आहेत.

उच्च शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशी जाऊन शिक्षण घ्यावं लागलं होतं. त्यावेळी माता रमाई यांच्यावर संपूर्ण संसाराचा, घराचा भार होता. या काळात रमाबाईंनी केव्हाही आपल्या अडचणींची तक्रार बाबासाहेबांकडे केली नाही.

पतीचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. माता रमाई आणि बाबासाहेब यांच्या संघर्षाचे आजवर अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. तरुणींनी गायलेल्या या गाण्यात देखील त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगण्यात आली आहे. @rasika_borkar या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Viral Video
Video Viral : 'पोलिसांची काम करण्याची पद्धत माहितीये ना कशीये?', ACP सुनील तांबेंचा गुन्हेगारांना सज्जड दम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com