survivor crawls out alive from the mud after a deadly landslide in Uttarkashi caused by a cloudburst saam tv
व्हायरल न्यूज

Uttarkashi Dharali Cloudburst: चिखलाखाली दबला, रेंगत रेंगत आला बाहेर, धारलीमध्ये घडला दैवी चमत्कार!|Video Viral

Uttarkashi Cloudburst New Video: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाल्यानंतर भूस्खलन झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. अख्ख गाव डोंगराच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेलं. पण त्या चिखलातून एक व्यक्ती जिवंत बाहेर पडला असून त्याचा व्हिडिओ समोर आलाय.

Bharat Jadhav

  • उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे झालेल्या भूस्खलनात धाराली गाव मातीखाली गाडलं गेलं.

  • ५० हून अधिक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

  • एका व्यक्तीचा चिखलातून रेंगत बाहेर येतानाचा आशादायक व्हिडिओ व्हायरल

  • ही घटना पाहून लोकांमध्ये चमत्काराची भावना व्यक्त केली जात आहे

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये ढगफुटीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक माणूस चिखलाच्या ढिगाऱ्यातून 'जिवंत' बाहेर येताना दिसतोय. याला काही जण लक म्हणत आहेत, तर काही जण चमत्कार म्हणत आहेत. ढग फुटी झाल्यानंतर झालेल्या भूस्खलनामुळे हर्षिल दरीजवळील धाराली गाव उद्ध्वस्त झाले. संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यात ५० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती आहे.

याच भीतीदरम्यान एका आशादायक व्हिडिओ समोर आलाय. एक माणूस मातीच्या ढिगाऱ्यातून रेंगत रेंगत बाहेर येतो. सरकत सरकत तो चिखलातून बाहेर येत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिथे उभे असलेले काही लोक त्याला प्रोत्साहन देत आहेत. त्याचा आत्मविश्वास वाढवत होती. डोंगराचा काही भाग कोसळल्यानं गावातील सर्व घरे पत्त्यांसारखी कोसळली. या भूस्खलनात ५० पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत, तर ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. पण त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असावा, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री धामच्या आधी असलेल्या हर्षिल खोऱ्याजवळ धाराली गाव आहे. या गावावर ढगफुटी झाली. त्यानंतर भूस्खलन झालं. डोंगराचा काही भाग घसरला, ज्यामुळे धाराली गावातील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेली. आपत्तीस्थळी एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी, पोलिस, लष्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा खोऱ्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान मोदींनी आपत्तीबद्दल दुःख व्यक्त केले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Damage Symptoms: सतत अपचन, जुलाब, पोट दुखतंय? असू शकतात लिव्हर डॅमेजची लक्षणे

Maharashtra Live News Update : : पुण्याच्या दौंड शहरात दुहेरी दरोडा; मध्यरात्री दोन ठिकाणी दरोडेखोरांचा धुमाकूळ

Viral Video News : हायवेवर स्टंट करताना भयंकर अपघात, शेवटची ३७ सेकंद काळजाचा ठोका चुकवणारी, VIDEO

Aloo Matar Recipe : हॉटेलमध्ये बनवतात तशी 'मटार बटाटा भाजी', रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटेल

Pune Gang War: आंदेकर टोळीतल्या समीर काळेचा भाऊ गणेश काळेला का संपवलं? जुनं कनेक्शन आलं समोर

SCROLL FOR NEXT