Uttarakhand News: उउत्तराखंडमधील केदारनाथमध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात सुदैवाने टळला. ऋषिकेश एम्स येथून केदारनाथकडे निघालेली एक एअर रुग्णवाहिका केदारनाथमधील हेलिपॅडवर उतरायच्या अगोदर क्रॅश झाली. या अपघातात कोणीही जखमी झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये दिल्लीतील दोन डॉक्टर आणि पायलेट होते. हा अपघात हे हेलिपॅडपासून साधारण २० मीटर अंतरावर घडला असून आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत रुग्णाला घेण्यासाठी हेलिकॉप्टर केदारनाथला(Kedarnath ) आल्याचे सांगण्यात येत असून ही एअर रुग्णवाहिका ऋषिकेश एम्सची असल्याचे सांगितले जात आहे.
हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक बचाव कर्मचारी शिवाय आपत्कालीन सेवा घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी डॉक्टर आणि पायलट यांना त्वरित सुरक्षित ठिकाणी हलविले आणि प्राथमिक उपचार दिले. अपघाताचे कारण समोर आले असून पुढील चौकशीही सुरु करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये अनेकांना आपली जीव गमवावा लागला होता. .हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरील प्रत्येक माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे. जसं की, इन्स्टाग्राम, फेसबूक आणि ट्वीटर अर्थात एक्सवर अशा माध्यमांवर. पण हा व्हिडिओ(Shocking Video) युट्युवरील saamtv यावर अपलोड करण्यात आलेला आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.