
Kedarnath temple visit : केदारनाथ हे उत्तराखंड राज्यातील सर्वात प्रसिद्ध असे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हिमालय पर्वाताच्या कुशीत वसलेले हे ठिकाण भगवान शिव यांच्या बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. येथे असलेले प्राचीन केदारनाथ मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. निसर्गरम्य सौंदर्य शिवाय हिमाच्छादित शिखरे आणि अध्यात्मिक वातावरण यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना अनोखा अनुभव मिळतो. जगभरातील मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, केदारनाथ या स्थळी कसे जायचे हे तुम्हाला माहिती आहे का?
भारतातील विविध धार्मिक स्थळी जाणाऱ्या प्रत्येक भाविकाची इच्छा असते एकदा तरी केदारनथला जावे. मात्र, हिमालयाच्या कुशीत वसलेले हे ठिकाण वर्षभर भाविकांसाठी सुरु नसते. कारण, हिवाळ्यात सर्वत्र बर्फाची चादर पसरली जाते. येथे तुम्ही एप्रिल महिन्याच्या शेवटपासून ते जून अखेरपर्यंत जाऊ शकता आणि दुसरं म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर हा काळ सर्वोत्तम मानला जातो. या सर्व महिन्यात केदारनाथला जाणारे रस्ते खुले असतात, ज्यामुळे तुमची यात्रा (Travel) सुखद पार पडते.
मुंबई शहरातून केदारनाथला जाण्यासाठी तुम्हाला विमान आणि रेल्वेपर्यास सुद्धा उपलब्ध आहे. पहिल्यांदा, तर तुम्ही विमानाने जात असाल तर तुम्ही मुंबईवरुन दिल्ली किंवा देहरादूनपर्यंत जा, मग तेथून रेल्वेने हरिद्वार किंवा ऋषिकेश येथे पोहचा. त्यानंतर रस्तेमार्गाने सोनप्रयागपर्यंत टॅक्सी किंवा बस उपलब्ध असते. या ठिकाणी पोहचल्यानंतर गौरीकुंडपर्यत वाहन असते. मग सुरु होतो तो केदारनाथ मंदिरापर्यंतचा पायी प्रवास. विशेष म्हणजे, तेथून हेलिकॉप्टर सेवा देखील उपलब्ध आहे. (Mumbai to Kedarnath distance)
केदारनाथ या धार्मिक स्थळी जाताना तुम्हाला सर्व वयोगटातील भाविक दिसतील. त्यासाठी येथे आलेल्या यात्रेकरुंसाठी हेलिकॉप्टरही सेवा सुरु करण्यात आली आहे. ही सेवा गुप्तकाशी, फाटा आणि सिरसी हेलिपॅडवरून सुरु करण्यात येते. ज्यासाठी तुम्हाला आधी बुकींगही करावे लागते. या सेवाचा उपयोग वयोरुद्ध आणि अपंग यात्रेकरुंना उपयुक्त ठरतो. ज्यामुळे त्यांची केदारनाथ यात्रा सुलभ आणि जलदही होते.
केदारनाथ हा ट्रेक सर्वात अवघड आणि अनेक अडचणींचा मानला जातो. या ठिकाणी तुम्ही जस जस उंचावर जाल त्यानुसार, तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता जाणवण्यास लागते. पण तरीही लाखोंच्या संख्येने भाविक हा ट्रेक पूर्ण करुन केदारनाथचे दर्शन घेतात. ट्रेक सुरु करण्यासाआधी प्रत्येक यात्रेकरुमनी चांगली शारीरिक तयारी करावी. त्यानंतर ट्र्रेक करताना बॅगमध्ये अतिजड सामान घेऊ नये. शिवाय आवश्यक औषधेही सोबत ठेवावी. ट्रेक सुरु केल्यानंतर वेळेवर विश्रांती घेणे गरजेते आणि ज्यामुळे हा ट्रेक सुखकर होतो.
केदारनाथ यात्रा करण्यासाठी यात्रेकरुंना यात्रेपूर्वी काही आवश्यक कागदपत्रांची नोंदणी करावी लागते. सर्वप्रथम तुम्हाला सरकारी ओळखपत्राचा पुरावा, ज्यामध्ये आधार कार्ड ,पासपोर्ट , मतदार ओळखपत्र , ड्रायव्हिंग लायसन्स यापैंकी एका कागदपत्राची आवश्यकता लागते. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, वैद्यकीय प्रमाणपत्र. संपर्क तपशील ज्यामध्ये तुमचा वयक्तीत मोबाईल नंबर आणि आपत्कालीन नंबर देणे आवश्यक असते. महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या प्रवास योजनेची संपूर्ण माहिती तिथे द्यावी लागते. ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने पूर्ण करु शकता.
केदारनाथला हजारो यात्रेकरुंनी दर्शनासाठी जात असतात. केदारनाथ ट्रेक (Trek) सुरु करताच तुम्हाला गौरीकुंड आणि लिनचोली येथेही निवासाच्या सुविधा मिळतात. शिवाय यात्रेकरुंना गेस्ट हाऊस उपलब्ध आहे. खासगी लॉज, धर्मशाळाही आहेत. काही पर्यटक स्वत:चे टेंट्सही सोबत ठेवतात आणि त्यात राहतात.
केदारनाथ हा ट्रेक अत्यंत अवघड असा मानला जातो. त्यामुळे जिथे जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरुंनी प्रवासापूर्वी आरोग्यादृष्टींने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली तर शरीराची योग्य तपासणी केली पाहिजे. प्रवासात पाणी पिणे महत्त्वाचे आहे. झोपेचही योग्य नियोजक करणे महत्त्वाचे आहे. प्रवासात मुख्य गोष्ट म्हणजे संतुलित आहार करणे गरजेचे आहे. जर तुमच्या सोबत वयोरुद्ध व्यक्ती असल्यास तुम्हाला त्यांच्या आरोग्याचा एकदा तपासणी करणे गरजेचे आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.