Matheran Hill Station : शिमला-मनाली, लोणावळा-महाबळेश्वरपेक्षाही माथेरानलाच पसंती का?

Maharashtra Travel destinations - उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागल्या आहेत. जर तुम्ही मुंबई-पुण्यात राहात आहात तर जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला नक्की भेट द्या.
Matheran Hill Station : शिमला-मनाली, लोणावळा-महाबळेश्वरपेक्षाही माथेरानलाच पसंती का?
Maharashtra Travel destinations
Published On

पावसाळा सुरू होताच प्रत्येकाची पावलं माथेरानच्या दिशेने आपसूक वळतात. मुंबई आणि पुण्यातील रहिवाशांना माथेरान हे पर्यटनस्थळ अत्यंत जवळ आहे. घनदाट जंगल आणि दाट धुकं असं आल्हाददायक वातावरण, त्यात भर म्हणजे विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा आवाज इथे कानी पडतो आणि तो आवाज वेड लावणारा असतो. माथेरानमध्ये असलेल्या बऱ्याच पॉईंट्सवरून सह्याद्री पर्वतरांगांचे विहंगम दर्शन पर्यटकांना घडतं, अशा अनेक कारणांसाठी माथेरान हे पर्यटकांची पावसाळ्यातील पहिली पसंती असते.

1) माथेरान स्पेशल का?

- माथेरान हे महाराष्ट्रातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. येथील पर्यावरणात तुम्हाला प्रदूषणमुक्त हवा अनुभवास मिळेल. शिवाय घनदाट जंगल, दाट धुकं आणि निसर्गरम्य दृश्य हे कायम प्रत्येक पर्यटकाला इथे येण्यासाठी आकर्षित करतं. इतकेच नाही तर इथे ३८ हून अधिक व्ह्यू पॉईंट्स, शिवाय घोडेस्वारी करण्यासाठी मिळते आणि या सर्वांसाठीच हे माथेरान खास ठरते.

२) माथेरान सर्वांपेक्षा वेगळं का ठरतं?

माथेरान हे सर्वात सुंदर हिल स्टेशन मुंबईपासून अतिशय जवळ आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत असतात. जर तुम्ही म्हटलं तर यात काय वेगळं आहे ते म्हणजे संपूर्ण माथेरान निसर्गरम्य असून प्रदुषणमुक्त आहे. येथे तुम्ही निसर्गरम्य वातावरणात फिराल ते तुम्हाला वेगळा अनुभव मिळतो. महत्त्वाचे म्हणजे माथेरानमध्ये मोबाइल नेटवर्क कमी मिळतं, त्यामुळे शहराच्या गोंगाटापासून दूर राहून मन:शांतीचा अनुभव घेता येतो. त्यामुळे माथेरान हे इतर ठिकाणांपेक्षा वेगळे ठरते.

३) सौंदर्यानं नटलेलं माथेरान ?

माथेरान हे पर्यटनस्थळ संपूर्णपणे निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर असे ठिकाण आहे. दाट जंगलं आणि दाट धुक्यात हरवणाऱ्या डोंगरदऱ्या शिवाय टॉट ट्रेनचा अनुभव यामुळे हे माथेरान पर्यटकांना एखाद्या स्वर्गासारखे वाटते.

४) माथेरान किती जुने आहे?

माथेरानचा इतिहास १७० वर्षांहून अधिक जुना आहे. ही जागा ब्रिटिश अधिकाऱ्यांना उन्हाळ्यात विश्रांती घेता यावी, यासाठी वापरली जात होती, असे मीडिया रिपोर्ट्स आहेत. माथेरान आजही पर्यावरणपूरक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.

५) माथेरान कधी आणि कसं जाल?

जर तुम्ही कुटुंबियांसोबत फिरायला जायचा विचार करत असाल तर माथेरान ठिकाण अतिशय चांगले आहे. या ठिकाणी तुम्हाला शांत वातावरण आणि निसर्ग सौदर्यं पाहण्यासाठी मिळेल. कुटुंबियांसोबत ताज्या हवेत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. शिवाय येथे तुम्हाला विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत.

६) माथेरानमध्ये खाण्यासाठी काय प्रसिद्ध आहे?

जगभरात माथेरान पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. तिथले पदार्थ फेमस आहेत. तिथे तुम्ही फिरताना पावभाजी किंवा भेळपुरीचा आस्वाद घेऊ शकता. शिवाय अनेक चिक्कीची दुकानं आणि त्यासोबतच चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स असे सर्व तिथे मिळतं.

७) माथेरानची कथा काय आहे?

माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील कर्जत तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. १८५० साली ब्रिटिश अधिकारी ह्यू पॉइंट्झ मॅलेट यांनी या पर्यटनस्थळाचा शोध लावल्याचा उल्लेख आहे.

८) माथेरानमध्ये काय खरेदी करावे?

माथेरानमध्ये खरेदीसाठी अनेक आकर्षक वस्तू उपलब्ध असतात. येथे तुम्ही स्थानिक हस्तकला; शिवाय आर्टिफिशियल फुलांचे अॅरेजमेंट्स, आणि विविध प्रकारच्या हस्तशिल्प वस्त्रांपासून ते घराच्या सजावटीसाठी उपयोगी वस्त्रे खरेदी करू शकता.

९) कोणत्या ऋतूत माथेरान सर्वोत्तम आहे?

माथेरान या पर्यटनस्थळी तुम्हाला जायचे असल्यास पावसाळा (जून ते सप्टेंबर) किंवा हिवाळ्यामध्ये (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) हे सर्वात उत्तम दिवस ठरतात. पावसाळ्यात थंड वातावरण आणि सर्वत्र हिरवळ असल्याने या स्थळाचे सौदर्यं अधिक खुलते; शिवाय हिवाळ्यात पर्यटकांना आरामदायक अनुभव मिळतो. अशा दोन्ही ऋतूंमध्ये माथेरानचे निसर्ग सौंदर्य अजूनच खुलते.

१०) माथेरानमधील ७ ठिकाणे कोणती आहेत?

माथेरानला आल्यावर तुम्हाला अनेक लहान- लहान ठिकाणं पाहायला मिळतात. पण तुम्ही तिथे गेल्यानंतर शार्लोट लेक (चार्लोट झील) पाहायला विसरू नका. त्यानंतर तुम्ही पॅनोरमा पॉइंट आणि एको पॉइंट, त्या पाठोपाठ वन ट्री हिल पॉइंट , रामबाग पॉइंट नक्कीच पाहा. माथेरानला संध्याकाळी सनसेट पॉइंट असलेल्या ठिकाणी नक्की जावा.

११) माथेरान टॉय ट्रेन कोणी तयार केली?

माथेरानमधील खास आकर्षण म्हणजे टॉय ट्रेन. पण तुम्हाला माहिती आहे का ही ट्रेन बांधण्याची कल्पना नेमकी कोणाची होती? साधारण १९०१ ते १९०७ च्या दरम्यान अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय यांनी नेरळ-माथेरान रेल्वे सेवा सुरू केली. ही रेल्वे सेवा करण्याची कल्पना म्हणजे पीरभॉय यांनी माथेरानला अनेकदा भेट दिली. तिथे येणं जाणं सोयीचं व्हावं म्हणून रेल्वे बांधायची होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com