Tiger Saam Tv
व्हायरल न्यूज

Uttarakhand Viral News: मित्राचा जीव वाचवण्यासाठी १२ वर्षाचा मुलगा थेट वाघाशी भिडला, उत्तराखंडमधील घटनेची देशभर चर्चा; नेमकं काय घडलं?

Viral Video: उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये एका अल्पवयीन मुलावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगा या हल्ल्यात जखमी झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttarakhand Dehradun A Boy Attacked By Tiger Video Viral:

उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये एका अल्पवयीन मुलावर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलगा या हल्ल्यात जखमी झाला आहे. यात त्याच्या मित्रांनी वाघाशी दोन हात करत मित्राला वाचवले आहे. यामुळे त्याच्या मित्राचे कौतुक होत आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एका अल्पवयीन मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्यातून रक्त येताना दिसत आहे. एका रिपोर्टनुसार, अल्पवयीन मुलगा खेळून झाल्यावर मित्रांसोबत घरी परतताना असताना ही घटना घडली आहे. (Latest News)

डेहराडून राजपूर पोलिस स्टेशनच्या परिसरातील कॅनॉल रोडवर ही घटना घडली आहे. निखिल थापा या मुलावर वाघाने हल्ला केला आहे. तो फक्त १२ वर्षांचा आहे. निखिल त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. खेळल्यांतर घरी येत असताना रस्त्यात अचानक वाघ समोर दिसला आणि त्याने निखिलवर हल्ला केला. वाघ निखिलवर हल्ला करत असताना त्याच्या मित्राने त्याला वाचवले.

निखिलच्या मित्रांनी प्रसंगावधान दाखवत जोरजोरात आरडोओरडा केला. आजूबाजू्च्या लोकांना जमा केले. जेणेकरुन जमावाच्या भीतीने वाघ निघून जाईन. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि वाघ निघून गेला. या घटनेत निखिलच्या मित्रांमुळेच तो वाचला आहे.

या घटनेत निखिलला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांना बाहेर खेळायला पाठवणेदेखील धोक्याचे असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : बोटीतून करा इतिहासाची सफर, १६व्या शतकातील 'हा' किल्ला पाहा

Today Gold Rate : सोनं प्रति तोळा ₹९८०० नी झालं स्वस्त, तर चांदीत ५३ हजारांची घट; वाचा सुवर्णनगरीतील 22k, 24k चे दर

Maharashtra Live News Update : पुण्यात भाजपा कोअर कमिटीची महत्वाची बैठक; महापौर पदावर कोणाची वर्णी? सस्पेन्स कायम

Home Remedies For Teeth: रोज दात घासूनही पिवळेच दिसतात? हे 5 घरगुती उपाय करा, दात मोत्यासारखे चमकतील

Arijit Singh : "मला माहित आहे..."; अरिजीत सिंगने प्लेबॅक सिंगिंग का सोडले? प्रसिद्ध गायकाने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT