CCTV Video: टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक, पती-पत्नी थेट हवेत फेकले गेले; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

CCTV Viral Video: धडक इतकी जोरात बसली की यात दुचाकीवरुन जाणारे पती पत्नी हवेत दूरवर फेकले गेले आणि धाडकन खाली कोसळले. अपघातात दोघेही मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत.
CCTV Video
CCTV VideoSaam TV
Published On

Accident News:

भरधाव वेगात वाहन चालवल्याने आजवर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेकदा समोरच्या व्यक्तीने नियम मोडल्याने निष्पाप व्यक्तींचा अपघात होतो, काहीवेळा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. नाशिक-छत्रपती संभाजीनगर मार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आलाय.

CCTV Video
Viral Accident Video: गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आधी आपटली..मग उडाली; काळजाचा ठोका चुकवणाऱ्या विचित्र अपघांताचे CCTV फुटेज व्हायरल

नाशिक -छत्रपती संभाजी नगर मार्गावर येवल्याच्या नगरसूल येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरात बसली की यात दुचाकीवरुन जाणारे पती पत्नी हवेत दूरवर फेकले गेले आणि धाडकन खाली कोसळले. अपघातात दोघेही मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत.

ही घटना घडली त्यावेळी एक ट्रक दुचाकीच्या मागून जात होता. या ट्रकमध्ये असलेला सीसीटीव्ही कॅमरा ऑन होता. सीसीटीव्ही कॅमेरा ऑन असल्याने घडलेला अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दुचाकी समोर धावत असताना तेथून काही गाड्या मागून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करत पुढे चालल्या आहेत. ओव्हरटेक करताना टेम्पो चालकाला पुढून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही.

ट्रकला ओव्हरटेक करून टेम्पो पुढे निघतो. यावेळी ट्रकच्या पुढे एक दुचाकी धावत असते. टेम्पो जेव्हा पुढे येतो तेव्हा भरधाव वेगात समोरुन देखील एक वाहन येत असतं. यामुळे टेम्पोचा धक्का दुचाकीला लागतो. यामुळे पती पत्नी दोघेही खाली पडतात. मागून येणारा ट्रक चालक आपला ट्रक तातडीने थांबवतो आणि त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतो. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

CCTV Video
Hingoli Crime : धक्कादायक! अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या आई- वडील, भावाला संपवले; खुनानंतर अपघाताचा केला बनाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com