Amol Kolhe On Ajit Pawar: 'वाघ जेव्हा जंगलात असतो, तेव्हा...'; अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित पवारांवर निशाणा

Amol Kolhe Latest News: कोल्हे यांनी या मोर्च्याची पदयात्रा बारामतीमधून सुरुवात केली. याच पदयात्रेच्या सभेतून खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं.
Amol Kolhe vs Ajit pawar
Amol Kolhe vs Ajit pawarSaamtv
Published On

Amol Kolhe On Ajit Pawar News:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकरी आक्रोश मोर्च्याला सुरुवात केली आहे. आज शुक्रवारी या मोर्च्याचा चौथा दिवस होता. कोल्हे यांनी या मोर्च्याची पदयात्रा बारामतीमधून सुरुवात केली. याच पदयात्रेच्या सभेतून खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. (Latest Marathi News)

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, बारामतीत अमोल कोल्हे येणार आणि काय बोलणार याकडं मीडियाचं लक्ष लागलं होतं. सब्र करो सब्र का फल मिठा होता है. महाराष्ट्र स्वाभिमान डिवचला जातोय, पण दिल्लीसमोर का उभा राहत नाही? वाघ जेव्हा जंगलात असतो. तेव्हा तो राजा असतो, पण डरकाळी फोडणारा वाघ जेव्हा पिंजऱ्यात जातो, तेव्हा काळजाला वेदना होतात'.

Amol Kolhe vs Ajit pawar
Nashik Crime News: 'मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, त्या अधिकाऱ्याला पुन्हा कामावर घ्या, तोतया अधिकाऱ्याचा प्रशासकांना फोन

'महाराष्ट्रच्या विकासाठी गेलेल्या वाघाची अवस्था सर्कशीसारखी झाली आहे. मी पुन्हा येईल असे म्हणाले की अडीच वर्ष येतंय. परत त्यात अर्धचं येतंय, परत यात अर्ध येतंय. गुडघे टेकवायचं की संघर्ष करायचा, आम्ही संघर्ष निवडला. पुन्हा येईल म्हणणार नाही, पण उरलेले उद्या बोलेल, अशा शब्दात कोल्हे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता टीका केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amol Kolhe vs Ajit pawar
PM Narendra Modi Interview: भाजप पक्षाचं अस्तित्व फक्त हिंदी पट्ट्यात आहे का? PM नरेंद्र मोदींनी मोजक्या शब्दात दिलं उत्तर

सुप्रिया सुळे यांची अजित पवारांवर टीकास्त्र

सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आक्रोश मोर्च्यात अजित पवारांवर निशाणा साधला. 'तुम्ही मला सुरुवातीला साहेबांची मुलगी आणि दादांची बहीण म्हणून निवडून दिले. कितीही दूषित वातावरण असले, तरी तुम्ही मला तीन वेळा निवडून दिले. सलग 8 वर्ष बारामतीत एक नंबरचा मतदार संघ हा आपला आहे, अशा सुळे म्हणाल्या.

'साहेबांनी शून्यातून हे साम्राज्य उभा केलं. जो दिल्लीत मान सन्मान मिळतो, तो बारामतीकरांनी निवडून दिले. 38 व्या वर्षी आजपर्यंत कुणीही मुख्यमंत्री झाले नाहीत..शरद पवार झाले. देशात कृषी मंत्री नाहीये. कृषी मंत्री विधी मंडळात गेले आहेत. कृषी प्रधान देशाला कृषी मंत्री नाहीये, अशी टीका सुळे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com