Nashik Crime News: 'मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, त्या अधिकाऱ्याला पुन्हा कामावर घ्या, तोतया अधिकाऱ्याचा प्रशासकांना फोन

Nashik News: मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय. तुमच्यासाठी एक निरोप आहे. त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घ्या, असा फोन मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून खणाणला. या फोनमुळं नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकच खळबळ उडाली आणि बँकेतील प्रशासक टेन्शनमध्ये आले.
Cm Eknath Shinde
Cm Eknath Shinde Saam Tv
Published On

Nashik Crime News:

मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय. तुमच्यासाठी एक निरोप आहे. त्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घ्या, असा फोन मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून खणाणला. या फोनमुळं नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत एकच खळबळ उडाली आणि बँकेतील प्रशासक टेन्शनमध्ये आले.

पण जेव्हा फोनची खातरजमा केली. त्यानंतर एक वेगळीज बातमी समोर आली. ही घटना नेमकी काय? हा प्रकार काय? याचबद्दल अजनून घेऊ.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cm Eknath Shinde
Jyoti Mete: आगामी निवडणुकीमध्ये शिवसंग्राम पक्ष भाजपसोबत राहणार की नाही? ज्योती मेटेंनी स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून प्रशासकांना फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव कानडे म्हणून सांगितले. नाशिक जिल्हा बँकेच प्रशासक प्रताग सिंग चव्हाण यांना फोन केला आणि मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, असं तो म्हणाला. बँकेचे अधिकारी पिंगळे यांना पुन्हा कामावर घ्या, असा निरोप फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने प्रशासकांना दिला. (Latest Marathi News)

पण मुख्यमंत्र्यांचे पीए असा फोन करतील? असा संशय प्रशासकांना आला. त्यामुळे प्रशासक प्रतापराव चव्हाण यांनी याबाबत सहकाऱ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये फोन फिरवत त्यांनी खातरजमा केली. यावेळी असा कुणीही फोन केला नसल्याचे उघडकीस आले.

Cm Eknath Shinde
Ram Mandir: 'मी बुद्धिस्ट आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांनी...'; राम मंदिर लोकार्पणाच्या निमंत्रणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

या गंभीर घटनेची माहिती प्रशासकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली. तोतया फोन करणाऱ्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. यावेळी पोलिसांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com