Prayagraj Accident Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

UP Accident CCTV: ई-रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणाने घेतला तरुणाचा जीव, अपघाताचा धक्कादायक CCTV व्हिडीओ व्हायरल

Prayagraj Accident Viral Video: हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी ई-रिक्षा चालकाविरोधात संताप व्यक्त केला आहे. या अपघातामध्ये ई-रिक्षा चालकाची चूक असताना देखील अपघात झाल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

Priya More

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराजमध्ये ई-रिक्षा आणि दुचाकीच्या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी यमुना पुलावर हा अपघात झाला होता. या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी ई-रिक्षा चालकाविरोधात संताप व्यक्त केला आहे. या अपघातामध्ये ई-रिक्षा चालकाची चूक असताना देखील अपघात झाल्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

नवीन यमुना पुलावर ई-रिक्षा चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीस्वार तरुणाला आपला जीव गमवावा लागला. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यमुना पुलावर ई-रिक्षा चालकाने अचानक यु-टर्न घेतला. त्यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीचालकाला अचानक ब्रेक दाबता आला नाही. त्यामध्ये दुचाकीस्वाराने ई-रिक्षाला जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर ई-रिक्षा चालक थांबला नाही. तर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अपघाताची ही घटना शनिवारी दुपारी घडली होती.

या अपघातामध्ये २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. दुचाकीवरून हा तरुण शहरातून नैनीच्या दिशेने जात होता. दरम्यान, मिंटो पार्कसमोरील नवीन यमुना पुलावरून पुढे जाणाऱ्या ई-रिक्षाचालकाने अचानक यू टर्न घेतला. त्यामुळे दुचाकीस्वार तरुण ई-रिक्षाला धडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

आकाश सिंग असे या तरुणाचे नाव असून तो चका नैनी येथे राहत होता. रविवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. किडगंज पोलिस निरीक्षक दीपा सिंह यांनी सांगितले की, अज्ञात ई-रिक्षाचालकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT