Google Maps Saam Tv
व्हायरल न्यूज

Google Maps: गूगल मॅपने विश्वासघात केला, उड्डाणपूलावर कार हवेत लटकली, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Car Stuck On Under Construction Flyover: गुगल मॅपचा वापर आपल्यापैंकी प्रत्येकजण करत असतो. मात्र सध्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही गुगल मॅपचा वापर करण्यापूर्वी तुम्हीही जागरुक राहाल. नक्की काय घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जी गुगल मॅपवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्यांसाठी एक मोठा धडा ठरू शकते. मोबाईलवरील नकाशाच्या आधारे प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाची कार थेट बांधकामाधीन उड्डाणपुलावर जाऊन अडकली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही आणि कारदेखील पुलावरच थांबली हे नशिब बलवत्तर म्हणावे लागेल.

ही घटना घडली आहे महाराजगंज जिल्ह्यात. एका कुटुंबाने प्रवास (Travel)सुरु केला होता. त्यांना एका ठिकाणी पोहोचायचं होतं आणि त्यासाठी गुगल मॅपचा आधार घेतला होता. मॅपने दाखवलेला रस्ता फॉलो करत करत त्या कुटुंबियांनी गाडीचा एक टर्न घेतला आणि काही अंतरावर एक उड्डाणपुल दिसला. मॅपवर मात्र त्या पुलाचा रस्ता खुले असल्याचं दाखवत होतं. त्यामुळे त्यांनी कुठलाही संशय न घेता गाडी त्या दिशेने चालवली. मात्र, काही अतंरावर जाताच हा भयानक अपघात घडला.

घडलेल्या या अपघाताच सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कारदेखील खाली कोसळली नाही. दिवसभरात रस्त्याने जाणारा प्रत्येक प्रवाशी संपूर्ण घटना पाहून हैराण झालेला आहे तर काहींनी हा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करुन सोशल मीडियावरही पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर देशभरात वाऱ्याच्या वेगाने पाहिला गेला.

@SachinGuptaUP या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ (Video) अपलोड ९ जून रोजी अपलोड करण्यात आलेला आहे. ही घटना पाहताच त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहे.''नशीब स्वर्गात सोडल नाही'' अशी एका यूजरने कमेंट केली तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कारमधील व्यक्ती किती घाबरले असतील'' तर अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT