Up Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

हे सुधारणार नाहीत! हायवेवर तरुणाचा खतरनाक स्टंट, 1 किमीपर्यंत धावत्या बाईकवर राहिला उभा

Bike Stunt Video: स्टंट करणं अनेकदा तरुणांच्या अंगलट आले असले तरी स्टंटबाजी थांबवण्याच नाव घेत नाही. सध्या सोशल मीडियावर अजून एका बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टंट करताना पुढे काय घडते ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Up Viral Video: उत्तर प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातील राठ पनवाडी रोडवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिथे एका युवकाने भररस्त्यात धोकादायक स्टंट करत सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. या युवकाने तब्बल एक किलोमीटरपर्यंत आपल्या बाईकवर उभं राहत चालवली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला असून नेटकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की, युवक भररस्त्यात कोणतीही सुरक्षा न घेता बाईकवर उभा राहून ती चालवत आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी इतर वाहनांची वर्दळ असूनही त्याने आपल्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ करत ही स्टंटबाजी(Stunt) केली. हा प्रकार राठ पनवाडी या रस्त्यावर घडला असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

या व्हिडिओवर(Video) लोकांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी तर थेट लिहिलं आहे,"काय वाटतंय का याला जीव प्यारा नाही?", तर काहींनी चक्क म्हणलं, "यमराज सुट्टीवर असावेत बहुतेक'' अशा प्रतिक्रियांमधून लोकांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण अशा प्रकारचं वर्तन केवळ स्वतःच्याच नाही, तर इतरांच्या जिवालाही धोका पोहोचवणारं असतं.

सध्या ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली असून संबंधित व्हिडिओच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, व्हिडिओमधील युवकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओळख पटताच त्याच्यावर संबंधित कायदेशीर कारवाई केली जाईल. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा प्रकारच्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

टीप: हा स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT