Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बाई असं वागणं बरं नव्हं! भरवर्गात शिक्षिका ढाराढूर झोपली, मुलं पाहा काय करतायेत...VIDEO व्हायरल

Teacher Sleeping In Class: सोशल मीडियावर सध्या एका शाळेतील व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात एक शिक्षिका भरवर्गात गाढ झोपलेली आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Trending Classroom Video: सोशल मीडियावर बऱ्याचदा शाळेतील विद्यार्थ्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र सध्या एका शाळेतील लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्या व्हिडिओमध्ये एका शाळेत शिक्षिका भरवर्गात झोपलेली आहे.हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका शाळेतील वर्गात एक महिला शिक्षिका(Teacher) खुर्चीवर बसलेली दिसत आहे.मात्र एक तरुण येतो आणि त्या शिक्षिकेजवळ जातो मात्र काय ती शिक्षिका चक्क झोपलेली असते.तरुण सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद करतो.त्यानंतर तो तरुण तिथे अभ्यास करत असलेल्या एका विद्यार्थ्यीला विचारतो तर शिक्षिका अभ्यास घेतात तुमचा तर ती विद्यार्थीनी शिक्षिकेकडे पाहत हो बोलते.मात्र त्यानंतर ती शिक्षिका तरुणाला व्हिडिओ नको करुस असे सांगत असताना व्हिडिओत दिसत आहे.

झोपलेल्या शिक्षिकेचा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून @alkesh_kushwaha या अकाउंटवर अपलोड करण्यात येत आहे.हा व्हिडिओ कधीचा आहे आणि कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या जोरदार व्हायरल (Viral)होत आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''शिक्षिका आराम करताना दिसली आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी ती स्वतः खुर्चीवर झोपली''असे लिहिण्यात आलेले आहे.

नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया

व्हिडिओतील शिक्षिकेचा प्रताप पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत,मात्र त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''कारवाई करा'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''काय सुरु आहे यांच''अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: शिक्षिकेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Kulkarni: गौरी कुलकर्णीचं खास फोटोशूट; जांभळ्या साडीत खुललं सौंदर्य, साधेपणात खुलला स्टायलिश अंदाज

Divorce Case : पतीला जाडा किंवा काळा बोलणं घटस्फोटाचं कारण मानलं जाऊ शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय

Maharashtra News Live Update : यवतमाळमध्ये अल्पभूधारक युवा शेतकऱ्याचा मृत्यू

Mangalsutra Designs: 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र, 5 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

15 Days Without Maida: 15 दिवस मैदा खाणं सोडलं तर शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT