Pune : दम दिला, धिंड काढली तरी पुण्यातील गुंडाची अरेरावी संपेना|VIDEO

पुण्यातील गुंडांना पोलिसांचा धाक राहिला का? असा सवाल उपस्थित होत आहे. धिंड काढली, दम दिला तरी पुण्यातील गुंडांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निलेश घायवळ या गुंडाचा व्हिडीओ सोशल मीाडियावर व्हायरल झालाय.

Pune gangster Nilesh Ghaiwal : पुण्यातील गुंडांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिथे गुन्हा केला त्याच ठिकाणी धिंड काढत गुन्हेगारांन धडा पोलिसांकडून शिकवला जातोय, पण तरीही पुण्यातील गुंडाची अरेरावी संपत नसल्याचे दिसत आहे. कारण कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

"नंबरकारी मोठा शिकारी आणलाय पोलिस ठाण्यात" गाण्यावर कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एका लग्नाच्या समारंभात हे गाणं आहे, आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ सोबतचा फोटो व्हायरल झाला होता.

निलेश घायवळ याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. निलेश बन्सीलाल घायवळ मूळ राहणार सोनेगाव तालुका जामखेड येथील राहणारा आहे. त्याच्यावर पुण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील गुन्हेगारांना चाप बसवण्यासाठी पोलिसांनी गुन्हा केला त्याच ठिकाणी धिंड काढण्याची योजना आखली, पण पुण्यातील गुंडाची अरेरावी संपत नसल्याचे दिसत आहे.

Pune gangster Nilesh Ghaiwal
Pune : पुण्यात धिंड पॅटर्न, आरोपीने जेलमधून सुटल्यानतर काढली रॅली, पोलिसांनी त्याच ठिकाणी काढली वरात, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com