Pune : पुण्यात धिंड पॅटर्न, आरोपीने जेलमधून सुटल्यानतर काढली रॅली, पोलिसांनी त्याच ठिकाणी काढली वरात, VIDEO

Pune News : आरोपींना धडा शिकवण्यसाठी पुणे पोलिसांनी चांगलीच युक्ती लढवली आहे. ज्या ठिकाणी आरोपी गुन्हा करतो, त्याच ठिकाणी त्याची धिंड काढली जातेय. पुणे पोलिसांच्या या उपक्रमाची राज्यात चर्चा होत आहे.
Pune crime News
Pune crime News
Published On

अक्षय बडवे

Pune Crime News : जेलमधून सुटल्यानंतर आरोपीने रॅली काढली होती. आता पोलिसांनी तिथेच काढली त्याची वरात काढत चांगलाच धडा शिकवलाय. पुणे पोलिसांचा धिंड पॅटर्न राज्यात चर्चेत आहे. पुणे पोलिसांकडून आता आरोपींची परेड आणि धिंड रोडवरच काढली जात आहे. ज्या ठिकाणी गुन्हा केला जातो, अथवा ज्या ठिकाणी आरोपी मस्ती करतात, तिथेच पोलिसांकडून धिंड काढली जातेय. जानेवारी महिन्यात एका आरोपीने जेल मधून बाहेर आल्यानंतर साथीदारांसह येरवडा परिसरात रॅली काढली होती, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याची धिंड काढली. गुड्ड्या कसबे असे या प्रमुख आरोपीचे नाव आहे.

Pune crime News
Pune : पुणे पोलिसांनी आरोपींचा माज उतरवला, जिथं गुन्हा केला तिथेच काढली धिंड

मिळालेल्या माहितीनुसार, मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा जानेवारी महिन्यात जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० मित्रांनी येरवडा बाजार परिसरात दुचाकीवरून रॅली काढली. रॅलीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. यावेळी आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था वर सुद्धा अनेकांनी टीका केली होती

Pune crime News
Pune : पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट, उंदरांनी घेतलेल्या चाव्यात विद्यार्थी जखमी, २ जणांना रेबिजची लक्षणं

यानंतर पोलिसांनी यातील अनेकांना पकडून त्यांना त्याच भागात त्यांची वरात काढून त्यांचा समाचार घेतला होता. आज पुन्हा एकदा पोलिसांनी प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे, प्रथमेश संजय राठोड, बाबा भानुदास गवळी याच्यासह घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली. तसेच या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतर आरोपींचा शोध व गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांचा शोध पोलिसांकडून घेण्यात आला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com