Puri beach accident saam tv
व्हायरल न्यूज

Viral news: समुद्र किनाऱ्यावर घडली मोठी दुर्घटना; अंघोळीला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

Puri beach accident: ओडिशातील पुरी समुद्रकिनाऱ्यावर दोन पर्यटक बुडून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ओडिशातील पुरी समुद्र किनाऱ्यावर सोमवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. समुद्रात अंघोळीसाठी उतरलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सेक्टर-14 लाइटहाउस बीच परिसरात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास हे दोन्ही पर्यटक समुद्रात अंघोळीसाठी उतरले होते. त्यावेळी सुरुवातीला परिस्थिती सामान्य होती. परंतु अचानक आलेल्या जोरदार लाटांमुळे ते अडकले आणि हळूहळू खोल पाण्याकडे वाहत जाऊ लागले. किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांना पाहताच तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. यावेळी लाइफगार्ड तसंच अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली.

सूचना मिळताच बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचलं होतं आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. व्हायरल व्हिडिओमध्ये बचाव पथकाचे सदस्य समुद्राच्या लाटांशी झुंज देत पर्यटकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेक प्रयत्नांनंतर दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात यश आलं, मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती.

रूग्णालयात केलं दाखल

यावेळी बुडालेल्या तातडीने पुरी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. जास्त वेळ पाण्यात राहिल्यामुळे आणि समुद्राच्या प्रचंड प्रवाहामुळे त्यांचे प्राण वाचवणं शक्य झालं नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, या घटनेतील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्थानिक प्रशासन त्यांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत. सोशल मीडियावर या घटनेबद्दल दुःख आणि संताप व्यक्त केला जातोय. काही यूजर्सनी 'समुद्र किनाऱ्यावर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करायला हव्यात' अशी प्रतिक्रिया दिलीये.

तज्ज्ञांच्या मते, पुरीसारख्या समुद्र किनाऱ्यांवर अचानक बदलणाऱ्या लाटांमुळे धोका वाढतो. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रात उतरताना लाइफगार्डच्या सूचनांचे पालन करणं अत्यावश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

माथेफिरूचा थरार, भीषण गोळीबारात ८ लहान मुलांचा मृत्यू

कल्याण-डोंबिवलीची वाहतूक कोंडी सुटणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT