Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मृत्यूला आमंत्रण देणारा तरुणाचा स्टंट; बाईकचा स्टंट पाहून वाढतील हृदयाचे ठोके

Bike Stunt Viral Video: सध्या तरुणाईला रिल्स काढण्याचे, व्हिडिओ बनवण्याचे प्रचंड वेड लागलयं. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठी तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्याच्या तरुणाईमध्ये आपल्याला कमालीचा उत्साह दिसून येतो. मात्र त्यांचा हा उत्साह त्यांच्या अनेकदा अंगलट येतो. या वाक्याचा प्रत्यय तुम्हाला सोशल मीडिया व्हायरल व्हिडिओ पाहून येत असेलच. सोशल मीडियावर अनेक बाईक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे स्टंट तरुण जीवाची पर्वा न करता करत असतात. या स्टंट व्हिडिओना पाहून आगांवर अक्षरशा कापरे भरतात. पुन्हा एकदा सोशल मीडियावर असाच एका बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सध्याच्या तरुणाई चर्चेत येण्यासाठी अनेक धोकादायक स्टंट करत असतात. ज्यामुळे मोठे अपघातही(Accident) होतात. अनेकदा सोशल मीडियावर झालेल्या थरारक अपघांताचे व्हिडिओ व्हायरलही झालेत तरीही असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत , एका रस्त्यावर आपल्याला एक हिरव्या रंगाची बस दिसून येते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला काही घर तर हिरवी झाडी दिसत आहेत. त्या दरम्यान त्याच रस्त्यावर एक तरुण एक बाईक घेऊन जात आहे. दरम्यान तो तरुण धावत्या बाईकवर (Bike)स्वता:चा तोल सांभाळत उभा राहतो. धावत्या बाईकवर काही वेळासाठी तो तसाच उभा राहतो. त्यात तो बसच्याही पुढे जातो. काही वेळानंतर तो बाईक पुन्हा बसून जातो. सर्व धावत्या बाईकवरचा स्टंट व्हिडिओ त्याच्यापाठी असलेल्या व्यक्तीने आपल्या मोबाईमध्ये कैद केलाय.

सर्व स्टंट व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @ChapraZila या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ शेअर करत व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'सध्या यमराजजी झोपले आहेत, त्यामुळे त्यांचा जीव वाचला, पण समस्तीपूर पोलीस हे पाहत आहेत का?'.व्हिडिओ पोस्ट होताच अनेक नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shocking: पोटच्या गोळ्याचे भयानक कृत्य, दारूच्या नशेत आईची हत्या, बापालाही बेदम मारलं

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

SCROLL FOR NEXT