Couple Romantic Dance In Rain Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Rain Dance Viral Video: पहिला पाऊस; दोघांच प्रेम अन् भर रस्त्यात रोमँटिक डान्स... व्हिडिओ पाहून नेटकरी प्रेमात!

Couple Romantic Dance In Rain Viral Video: पहिल्या पावसात खुललेल हे प्रेम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे....

Gangappa Pujari

Dance In Rain Viral Video: पहिल्या पावसाचं प्रत्येकालाच आकर्षण असतं. पहिला पाऊस पडताच तो वातावरणात आलेला गारवा, मातीचा सुगंध आणि सुचलेल्या कविता हे समिकरण जणू ठरलेलचं. म्हणूनच पहिल्या पावसाची प्रत्येकालाच आतुरता लागलेली असते. अशा मुसळधार पावसात आपली प्रेयसी सोबत काय असेल तर; बातच न्यारी नाही का?

सध्या असाच एका कपलचा सुंदर व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तरुण- तरुणी मुसळधार पावसात जबरदस्त रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या अदा आणि स्टेप्स पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत. (Romantic Dance In Rain Viral Video)

पहिला पाऊस अन् सुंदर डान्स...

कालपासून देशभरात सर्वत्र पावसाने (Rain) दमदार एन्ट्री घेतली आहे. मुंबईसह देशातील विविध राज्यात धो- धो पाऊस पडला. सर्वजण पहिल्या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या अशाच एका सुंदर व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

ज्यामध्ये तरुण- तरुणी सुंदर डान्स करताना दिसत आहेत. भरपावसात दोघेही बेधुंदपणे डान्स करत पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. त्यांच्या एकेक स्टेप्स पाहून नेटकरीही चांगलेच प्रेमात पडले आहेत. (Latest Rain Update)

व्हिडिओ होतोय व्हायरल...

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंदोर शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तु है तु मुझे फिर और क्या चाहिये या रोमँटिक गाण्यावर हे दोघेही बेधुंद होवून हातात हात घेवून सुंदर डान्स (Romantic Dance) करत आहेत. रस्त्यावर गाड्यांची -माणसांची निवाऱ्यासाठी चांगलीच धावपळ चाललेली असताना हे कपल मात्र निवांत पहिल्या पावसाचा बेधूंद होवून मजा लुटत आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चांगलेच खुश झाले आहेत...

नेटकरी पडले प्रेमात!

या व्हिडिओने (Viral Video) सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला हजारो लाईक्स आल्या असून नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या सुंदर डान्सचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी त्यांना पावसात न भिजण्याचा सल्ला दिला आहे. पहिल्या पावसात खुललेल हे प्रेम सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT